गाव तिथे काँग्रेसच्या शाखेसाठी तयारी करा-अध्यक्ष सुरेश शिवपुजे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 15, 2022

गाव तिथे काँग्रेसच्या शाखेसाठी तयारी करा-अध्यक्ष सुरेश शिवपुजे

 गाव तिथे काँग्रेसच्या शाखेसाठी तयारी करा-अध्यक्ष सुरेश शिवपुजे 

वडवळ (कटूसत्य वृत्त):-  मोहोळ तालुक्यातील काँग्रेसचे गतवैभव पुन्हा वाढवण्यासाठी पक्षाचे चिन्ह पुन्हा घराघरात पोहोचवून गाव तिथे काँग्रेसच्या शाखेसाठी तयारी करावी, असे आवाहन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश शिवपुजे यांनी केले.मोहोळ तालुका काँग्रेसची बैठक वडवळ येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश शिवपुजे होते.या बैठकीत जिल्हा परिषद गटनिहाय पक्ष कामाचा आढावा, आगामी निवडणुकांमध्ये पक्ष वाढीसंदर्भात धोरण, गाव तिथे काँग्रेसची शाखा इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली.यावेळी मोहोळ तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी दमन चव्हाण यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर, सुभाष पाटील, उपाध्यक्ष सिद्राम पवार, किशोर पवार, राजेश पवार, बिरासाहेब खरात, सरपंच जालिंदर बनसोडे, नामदेव खांडेकर,दाजी कोकाटे, भैरू भोसले, ज्ञानदेव पाटील, रतन कसबे, यशोदा लोखंडे,भगवान गुरव, त्रिंबक जाधव, वसुदेव उकळे, रेवण उकळे, नागेश बिराजदार,समाधान सोनटक्के, राजेंद्र सर्जे,सुखदेव कांबळे, आप्पा हंडे, तानाजी देशमुख, शिवकुमार शिवपुजे, नागनाथ शिवपुजे, नाना शिवपुजे, सूर्यकांत सुपाते आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages