छत्रपतींचा आदर्श घेऊन बाळासाहेब कोरकेंनी शेतकऱ्यांना ज्ञानार्जनाचे नंदनवन फुलविले - प्रा. बानगुडे पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 29, 2022

छत्रपतींचा आदर्श घेऊन बाळासाहेब कोरकेंनी शेतकऱ्यांना ज्ञानार्जनाचे नंदनवन फुलविले - प्रा. बानगुडे पाटील

 छत्रपतींचा आदर्श घेऊन बाळासाहेब कोरकेंनी शेतकऱ्यांना ज्ञानार्जनाचे नंदनवन फुलविले - प्रा. बानगुडे पाटील 



वैराग (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने शेतकरी व शेतकऱ्यांच्यां मुलांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्याच पध्दतीने महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कै.बाळासाहेब कोरके (बप्पां) यांनी शेतकरी व शेतकऱ्यांच्यां मुलांना सोबत घेऊन ज्ञानार्जनाचे नंदनवन फुलविले, असल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे-पाटील यांनी वैराग येथे शिक्षणमहर्षी बाळासाहेब कोरके यांच्या ६५ व्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी बोलताना केले.


बार्शी तालुक्यातील वैराग येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या आवारात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. राजेंद्र राऊत तर प्रमुख पाहुणे माजी मंत्री दिलीप सोपल होते. पुढे शिवचरित्र सांगत असताना बानगुडे-पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदीप्यमान वारसा छत्रपती संभाजी महाराजांनीही तितक्याच जोमाने चालविला. खूप कमी सैन्यांचा बळावर स्वराज्य कसे निर्माण केले याबाबत उदाहरण देऊन स्पष्ट केले. तसेच जर रण जिंकायचं असेल तर आधी मन जिंकावे लागेल. त्यासाठी मन घडवावे लागेल आणि मन केवळ ज्ञानानेच घडू शकते. हे लक्षात घेऊन डाॅ.कपिल कोरके यांनी बप्पांनी निर्माण केलेले वटवृक्षाचे रूपांतर जंगलात करावे अशी अपेक्षाही शेवटी बानगुडे-पाटील यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी आ. राजेंद्र राऊत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्व. शिक्षणमहर्षी बाळासाहेब कोरके यांचे मेडिकल कॉलेज उभारण्याचे स्वप्न होते त्यासाठी त्यांनी दोन मुली व एका मुलाला डॉक्टर बनवले. त्यांचे वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी काही गरज पडेल ती मी पूर्ण करेन, असे आश्वासन आ. राऊत यांनी यावेळी दिले. 

यावेळी माजी मंत्री दिलीप सोपल यांनी बप्पा म्हणजे माझ्या भावासारखे होते. ते जिद्द कायम उराशी बाळगायचे. आता इथून पुढे त्यांच्या मुलांनी ही जिद्द बाळगावी, अशी आशा व्यक्त केली. स्व. बप्पांनी लावलेले जय जगदंबा परिवाराचे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. या वटवृक्षाच्या सावलीखाली हजारो कुटुंब नांदत आहेत. हा परिवार आमचा एक कुटुंब असून इथून पुढे मी कुटुंबाचा प्रमुख म्हणून सर्व जबाबदारी व्यवस्थित पार पाडेन, असे संस्थेचे अध्यक्ष कपिल कोरके यांनी यावेळी भाऊक होऊन सांगितले. 

स्व. शिक्षणमहर्षी बाळासाहेब कोरके यांच्या जयंतीच्या निमित्ताने वैराग शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि पारंपारिक वेशभूषा करून अनेक विद्यार्थ्यांनी लेझीम दांडिया खेळत अनेकांची मने जिंकली. 

यावेळी संतोष निंबाळकर, मकरंद निंबाळकर, सुभाष शेळके, विनायक गरड, युवराज काटे, बाबासाहेब गायकवाड, संजय भूमकर, अरुण कापसे, अॅड. रणजित गुंड, समाधान डोईफोडे, काकासो कोरके, आनंद कोरके, आनंद काशीद, भाऊसाहेब आंधळकर, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, सुधीर बारबोले, अरुण सावंत, सिध्देश्वर माने, विनोद नाना वाणी, सुरेश गुंड, विनायक डोकेफोडे, डॉ.अमिता कोरके, डाॅ.शितल कोरके, माजी जि.प.सदस्य सुरेखा कोरके आदी मान्यवर उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे खूप मोठे योगदान होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages