शंकरराव मोहिते महाविद्यालयात माहिती अधिकार दिना निमित्त कार्यक्रम संपन्न

अकलूज (कटूसत्य वृत्त):- शंकरराव मोहिते महाविद्यालयात जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्त सेमिनार हॉलमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब मुळक हे होते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना ते म्हणाले की, "आपल्या देशात 2005 पासून समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा कायदा देशपातळीवर कायदा लागू झाला. सरकारी अधिकाऱ्यांनी सामान्य लोकांना माहिती देणे हे त्यांचे कर्तव्य आहे, त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसून प्रशासनात पारदर्शकता येण्यास मदत होते".
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाधिकारी डॉ. दत्तात्रय मगर , डॉ.सज्जन पवार, डॉ.सविता सातपुते आदी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी 210 विद्यार्थी उपस्थित होते. कार्यालयीन अधीक्षक युवराज मालुसरे तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. रौनक मुल्ला याने सूत्रसंचालन केले तर याने आभार त्रास शेख याने मानले.
No comments:
Post a Comment