येणाऱ्या गळीत हंगामसाठी 14 लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट
"वार्षिक सर्वसाधारण सभेत जयसिंह मोहिते पाटील यांचे प्रतिपादन"

अकलूज (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली सभेची सुरूवात संस्थापक सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील व रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
या सभेस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, आ. रणजीतसिंह मोहिते-पाटील, मदनसिंह मोहिते-पाटील, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्यासह उपाध्यक्ष ॲड प्रतापराव पाटील, सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी वर्ग, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेस उपस्थितांचे स्वागत करीत कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी विषयांचे वाचन केले. सभेपुढे आलेल्या सर्व विषयोना उपस्थित सभासदानी मंजुरी दिली.
येणाऱ्या गळीत हंगामासाठी 14 लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे सांगत अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या प्रगतीचा आढावा घेतला. कारखान्याने आत्तापर्यंत चार वेळा विस्तारीकरण केले आहे. सभासदांचे हित जोपासत विविध उपपदार्थ निर्मिती करत असून उपपदार्थ निर्मितीच्या अनेक प्रकल्पाचे अत्याधुनिकरणही केले आहे व करीत आहे. सभासदांच्या फायद्यासाठी एकरी उत्पादन वाढ होणे गरजेचे असून यासाठी कारखान्याने ऊस विकास प्रकल्प राबवला असून कारखान्याकडून इथेनॉल उत्पादन वाढवणेचा मानस आहे.जेवढे जास्त ऊस गाळप तेवढा उत्पादन खर्च कमी होत असल्याने सभासदांनी आपले एकरी उत्पादन वाढवत कारखान्याला जास्तीत जास्त ऊस द्यावा असे आवाहन मोहिते पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment