पायलट झालेल्या ऋतुजा पाटील यांचे अनगरकरांकडून जंगी स्वागत आ.यशवंत माने यांच्या हस्ते सन्मान


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- "मुलगी शिकली,प्रगती झाली"हे सुभाषित फक्त मुलींसाठीच म्हटल जातं कारण महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ,क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले,अहिल्यादेवी होळकरसह अनेक महान कर्तृत्ववान महिलांचा वारसा आहे. त्यामुळे एक कर्तृत्ववान कन्या म्हणून माजी आमदार राजन पाटील यांच्या सुकन्या कु.ऋतुजा यांनी कॅनडा मध्ये जाऊन प्रशिक्षण पूर्ण करून पायलट होणे ही बाब केवळ अनगरच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे असे गौरवोदगार मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी काढले.
कॅनडा येथे वैमानिक क्षेत्राचे उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेऊन यशस्वी पायलट बनलेल्या ऋतुजा राजन पाटील यांचे अभ्यास पूर्ण करून अनगरमध्ये प्रथमच आगमन झाल्यानंतर त्यांचे अनगरवासियांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.तर अनगर नगरपरिषदेमध्ये त्यांचा मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आ. राजन पाटील, लोकनेतेचे चेअरमन बाळराजे पाटील,डॉ. विनिता गोरे,पं.स. सदस्य अजिंक्यराणा पाटील, स्नेही रामचंद्र क्षीरसागर, उदयोजक संतोष वाबळे यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी आणि अनगर पंचक्रोशीतील ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने गावातून फटाक्यांची अतिषबाजी करत वाजतगाजत मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले. पाटील वाड्यातही मातोश्री राजश्री पाटील यांच्या उपस्थितीत यशस्वी पायलट ऋतुजा यांचे संपूर्ण पाटील परिवाराच्यावतीने कौटुंबिक पद्धतीने स्वागत करून त्यांना पुढील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
No comments:
Post a Comment