वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावर अजित पवार सत्ताधाऱ्यांना म्हणाले,".तर होऊ द्या दूध का दूध, पानी का पानी" - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 20, 2022

वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावर अजित पवार सत्ताधाऱ्यांना म्हणाले,".तर होऊ द्या दूध का दूध, पानी का पानी"

 वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावर अजित पवार सत्ताधाऱ्यांना म्हणाले,".तर होऊ द्या दूध का दूध, पानी का पानी"

मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यात सध्या वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.यासंदर्भात आता राज्याचे विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे.

अजित पवारांनी याविषयी बोलताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वेदान्त प्रकल्प राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. "वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत चर्चा खूप झाली. भाजपाच्या काही लोकांनी सांगितलं की मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत. ते जाणार असतील, तर त्यांनी वेदान्तच्या बाबतीत तरुण वर्गात, बेरोजगारांमध्ये पाहायला मिळत असलेली नाराजी दूर करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून तो प्रकल्प महाराष्ट्रात परत आणावा. मध्यंतरीच्या काळात फारशी माहिती नसणाऱ्यांनी वेगळ्या प्रकारची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला", असा दावा अजित पवारांनी केला आहे.

"उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार असताना शेवटपर्यंत असे प्रकल्प महाराष्ट्रात यावेत, म्हणून प्रयत्न करण्यात आले. काही पक्षांचे लोक असंही म्हणत आहेत की कुणी काही वेगळ्या मागण्या केल्या म्हणून प्रकल्प राज्याबाहेर गेले का? मी उपमुख्यमंत्री म्हणून तेव्हा काम करत होतो. अजिबात असं काही झालेलं नाही. संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर कुणाला असं काही वाटत असेल, तर केंद्र-राज्य सरकार त्यांच्या हातात आहे. महत्त्वाच्या तपास यंत्रणा त्यांच्या हातात आहेत. त्यांनी चौकशी करावी. चौकशी करायची असेल तर चौकशी करू द्या. दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या", असे आव्हानच अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना दिले.

"१५ जुलैला उच्चाधिकार समितीची बैठक झाली होती. त्या बैठकीत वेदान्त प्रकल्पाचा विषय चर्चेला आला होता. याचा अर्थ आमचं सरकार गेल्यानंतरची ही बैठक आहे. त्या बैठकीतही सरकारच्या समितीने यावर निर्णय घ्यायला हवा होता.काहीजण अफवा उठवत आहेत की आमच्याच काळात वेदान्तनं प्रकल्प राज्यात आणणं नाकारलं होतं, हे साफ चुकीचं आहे", असेही ते म्हणाले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages