खोटं बोल पण रेटून बोल ही भाजपची पध्दत ; पत्राचाळप्रकरणात ईडीने पवारसाहेबांचे नाव घेतलेले नाही- महेश तपासे

मुंबई (नासिकेत पानसरे):- पत्राचाळ प्रकरणात चौकशी सुरू आहे त्यात कुठेही ईडीने शरद पवारसाहेबांचे नाव घेतले नाही परंतु खोटं बोल पण रेटून बोल ही भाजपची पध्दत आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. पत्राचाळ प्रकरणी भाजपचे अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केला असून या आरोपाला महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे ते पचनी पडत नसल्याने अतुल भातखळकर यांनी नवीन बातमी निर्माण केली आहे.मोठमोठ्या नेत्यांवर आरोप करायचे हीच भूमिका भाजपची राहिली आहे. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. परंतु नेत्याची व पक्षाची बदनामी करण्याचा हेतू असतो असेही महेश तपासे म्हणाले. रोजगार, महागाई, शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याकडे भाजपचे लक्ष नाही फक्त सनसनाटी निर्माण करण्याकरीता भातखळकर यांचे ट्वीट आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment