रंगीला गणेशोत्सव मंडळांने सामाजिक बांधिलकी जपली

जीएम ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांचे गौरवोदगाररंगीला गणेशोत्सव तरुण मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- गेल्या अनेक वर्षापासून रंगीला गणेशोत्सव तरुण मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबवण्याबरोबर दर्जेदार सांस्कृतिक उपक्रम देखील राबवून मोहोळ शहराच्या दक्षिण भागातच नाही तर संपूर्ण तालुक्यात नावलौकिक मिळवला आहे असे गौरवोदगार सोलापूर येथील जी.एम. ग्रुप सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांनी काढले.
मोहोळ शहरातील युवा नेते लखनभाऊ कोळी यांच्या रंगीला गणेशोत्सव तरुण मंडळाच्या देखावा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या उदघाटन प्रसंगी वाघमारे बोलत होते. रंगीला गणेशोत्सव मंडळ हे गेल्या १४ वर्षापासून कोणतीही वर्गणी न गोळा करता समविचारी सहभागातून विविध सांस्कृतिक आणि समाजपयोगी उपक्रम राबवणारे मंडळ म्हणून मोहोळ मध्ये परिचित आहे. मंडळाच्या या वाटचालीबाबत उपस्थितांनी कौतुक व्यक्त करत लखन कोळी यांच्या सामाजिक कार्याला भरभरून शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान कोळी परिवाराच्या वतीने यावेळी करण्यात आला. सुत्रसंचालन अशोक धोत्रे यांनी केले तर आभार लखन कोळी यांनी मानले.
रंगीला गणेशोत्सव तरुण मंडळ च्या वतीने दररोज सायंकाळी श्री च्या आरतीस उपस्थित असणाऱ्या भाग्यवान महिलांना आकर्षक भेटवस्तू यामध्ये प्रथम क्रमांक सोन्याची नथ, द्वितीय क्रमांक साडी, तृतीय क्रमांक भिंतीवरील घड्याळ, क्रमांक चार पर्स क्रमांक पाच परफ्युम असे बक्षीस देण्यात आले. गौरीपूजन सजावट स्पर्धा महिलांसाठी भव्य संगीत खुर्ची जादूगार मनोरंजन कार्यक्रम सत्यनारायण पुजा महाप्रसाद असे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहे.
यावेळी व्यासपीठावर निवृत्त मंडलाधिकारी जगदीश कोळी,उद्योजक सचिन फाटे,नगरसेवक सुशील क्षीरसागर, सतीश काळे,आकाश फाटे,तालुकाप्रमुख बापू भोसले, नगरसेवक चंद्रकांत गोडसे, गणेश कोळी,पंकज कांबळे, सागर लेंगरे, तात्या मासाळ, राजू मुजावर, संयोजक लखन कोळी, सागर कोळी,योगेश गायकवाड इत्यादीसह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सागर भाऊ कोळी, लखन भाऊ कोळी, नरेंद्र कसबेकर, दीपक कांबळे, पंकज कांबळे, खंडू लवटे, विष्णू गोडसे, सोमनाथ कोळी, अलिश मोरे, योगेश फाळके, छोटू सिताफ, सचिन जानकर, ताहीर कुरुलकर, विशाल कोळी, जुबेर बागवान, मतीन बागवान, अजय जाधव, राजू मुजावर, नागेश सरवदे, विनोद कोळी, प्रमोद सरवदे, सुरज चव्हाण, शहाबाज बागवान, सागर अष्टूळ, नागेश चव्हाण, नाना सरक, उज्वल वाघमारे, इमरान पटेल, रमेश शिंदे, आकाश पवार, महेश गोरवे, नवनाथ कोळी, सचिन माळवतकर, गणेश होनमाने, प्रशांत चोरमले, नागेश कोळी, दया स्वामी, प्रदीप घोडके, जावेद शेख, पापा शेख, माऊली कोळी, बापू पारसे, नागेश भांगे, रवी महामुनी, बबलू कोळी, सुदाम शिंगाडे, गणेश धोटे, शेख मनोज कोळी, शैलेश सरवदे, सक्षम कोळी, प्रेम सरवदे, संतोष कोळी, प्रेम स्वामी, महेश मोरे, नवनाथ घोडके, सागर मेटकरी, राहुल पवार, आशिष खरात, वसीम खान, रुपेश काळे, तेजस बागणीकर, घनश्याम फाळके, आप्पा सरक, दिलीप खंदारे इत्यादी सह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment