चव्हाणवाडी (टें) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी नवनाथ शिंदे

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाणवाडी येथील चेअरमन अशोक मिस्कीन व चव्हाणवाडी चे तंटामुक्त अध्यक्ष अरुण चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चव्हाणवाडी(टें) ग्रामपंचायतच्या नूतन सरपंच पदी नवनाथ शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली चव्हाणवाडी चे विद्यमान सरपंच सुनील मिस्किन यांचा दीड वर्षाचा कार्यकाल संपल्याने त्या पदावर नवनाथ शिंदे यांची चव्हाणवाडी च्या सरपंच पदी निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनीषा लकडे व स्वप्नील सोनटक्के ग्रामसेवक संजय साळुंखे यांनी काम पाहिले
यावेळी नूतन सरपंच नवनाथ शिंदे यांचा सत्कार मा सरपंच सुनील मिस्किन यांनी हार फेटा शाल श्रीफळ देऊन केला यावेळी आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे आजी-माजी संचालक यांचाही मानसन्मान करण्यात आला. या निवडी वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे संजय भानवसे व गणेश कुलकर्णी यांनी आपले कर्तव्य बजावले निवडी वेळी चव्हाणवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचाही शाल श्रीफळ फेटा देऊन सन्मान करण्यात आला निवड जाहीर झाल्यानंतर चव्हाणवाडीतील ग्रामस्थांनी फटाक्यांची आतसबाजी करत व गुलालाची मुक्तपणे उधळण करीत जल्लोष साजरा केला.
यावेळी उपस्थित पार्टी प्रमुख अशोक मिस्किन, पार्टी प्रमुख अरुणबापू चव्हाण, रा. काँ. माढा तालुका उपाध्यक्ष हनुमंत चव्हाण, चव्हाणवाडी सोसायटीचे चेअरमन कैलास चव्हाण, रा. यु. काँ. माढा ता. उपाध्यक्ष संजय मिस्कीन, सोसायटीचे माजी चेअरमन नरहरी नांगरे, अॅड सचिन चव्हाण, माजी सरपंच सुनील मिस्कीन, उपसरपंच साळूबाई मोठे, ग्रामपंचायत सदस्य स्वाती चव्हाण, स्मिता नांगरे, सिंधूताई सलगर, ज्योती इंदलकर, व शिवशंकर हॉटेलचे मालक बाळासाहेब चव्हाण, अर्जुन सलगर, संतोष जाधव, सौदागर भोसले, सौदागर नांगरे, सुभाष चव्हाण, सुनील भोसले, मुंबई पोलीस चंद्रकांत रोडे, विजय रोडे, बापू चव्हाण, रमेश नांगरे, महावीर नांगरे, विलास नांगरे श्रीमंत इंदलकर, अनिल नांगरे, वैभव नांगरे, अनिल जगताप, संजय जगताप, शशिकांत नांगरे, मंगेश इंदलकर, विजय कदम, लक्ष्मण मोठे, मोहन नांगरे डॉ. मनोज नांगरे, श्याम नांगरे, अक्षय नांगरे, बंडू नागणे, गणेश चव्हाण व्हा चेअरमन अंकुश सलगर, तानाजी चव्हाण,जावेद काजी, बंटी नांगरे,टायगर ग्रुप चे अमीर काझी, शरिफभाई काझी, युवा नेते संग्राम चव्हाण, भाऊसाहेब इंदलकर, आसिफ काजी, विठ्ठल इंदलकर, ज्योतीराम भोसले, देविदास भोसले, अशोक भोसले, विनोद नांगरे, अमोल भोसले, विशाल भोसले, अतुल भोसले, समाधान शिंदे, संतोष भोसले, विजय शिंदे, सुधीर नांगरे, दत्तात्रय गायकवाड, बाळासाहेब नांगरे,सागर इंदलकर, विशाल इंदलकर, माऊली इंदलकर,रमजान काझी,लखन इंदलकर, सचिन मुळे व चव्हाणवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment