इंचगाव टोलनाक्यावर स्थानिकांना काम व टोलमाफी द्या अन्यथा आंदोलन छेडनार- भैय्या देशमुख

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग मधिल सोलापुर ते सांगोला रोडचे सध्या काम काही ठिकानी अपूर्ण असुन ते पूर्ण केल्या शिवाय नियमानुसार टोल वसुली करता येत नाही परंतु सध्या सर्व नियम डावलून इंचगाव येथे टोल वसूली सुरु असुन ती त्वरित थांबविण्यात यावी अशी मागणी जनहितचे भैय्या देशमुख यांनी केली आहे.
दोन वर्ष कोरोनाने लॉकडाउन मुळे सर्व जनता त्रस्त असुन लोकांच्याकडे उदरनिर्वाहासाठी पैसे नाहित अश्यात ही अव्वाच्या सव्वा टोलवसूली सुरु असुन, अनेक ठिकानी रस्त्याची कामेही अपूर्ण आहेत. मौजे सोहाळे येथिल ब्रिजच्या सर्विस रोडचे संपूर्ण काम करने बाकी असुन, बेगमपुर येथिल ब्रिजच्या साईडचे गटारीचे काम अपूर्ण असल्याने सर्व गहाण पाणी ब्रिज खाली साठत असल्याने येथिल इंदिरानगर व अर्धनारी येथिल ग्रामस्थांना वाहतुकीसाठी गटारीच्या पाण्यातुनच प्रवास करावा लागत आहे.अशी अनेक कामे बाकी आहेत शासन नियमानुसार रोडचे संपूर्ण काम पुर्ण झाले शिवाय टोल सुरु करता येत नाही तरीही टोल सुरु करण्यात आला आहे, एकीकडे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी स्थानिकांना टोलमाफी, ज्यांच्या जमिनी टोलमध्ये गेल्या आहेत त्यांना टोल नाक्यावर कामासाठी सामावुन घेतले जाईल अशा घोषणा करित आहेत, तर दुसरीकडे इंचगाव येथिल टोल प्रशासन पूर्ण नियम डावलून कामगारभर्ती, टोल वसूली करित आहेत. स्थानिकांच्या जमीनी अलीकडे अन राहन्यासाठी पलीकडे अशी स्थिती अनेकांची आहे त्यांना रोज टोलनाक्यावरुन ये_जा करावी लागते, अगोदरच शेती अडचनित असुन, एकीकडे सरकार शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाता मारत असुन दुसरीकडे या टोलमुळे आनखी खिशाला भूर्दंड बसनार आहे याचा विचार करून स्थानिकांना त्वरित टोलमाफी देन्यात यावी तसेच सोहाळे येथिल सर्विस रोडचे काम पुर्ण करण्यात यावे अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांनी केली आहे अन्यता रस्त्यावर उतरून दि. 14/9/2022 वार शनिवार रोजी ठीक 11 वाजता आंदोलन करून न्याय मिळाल्या शिवाय उठनार नाही असे त्यांनी सांगीतले.
यावेळी निवेदन केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी सोलापुर, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण क्र.166 सोलापुर, सहाय्यक पोलिस निरिक्षक कामती पोलिस स्टेशन दिल्याचे त्यांनी सांगीतले. आंदोलनाच्या होनार्या परिणामास स्वत: टोल नाका प्रशासन यंत्रणा जबाबदार राहिल असे भैय्या देशमुख यानी सांगीतले.
यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे मोहोळ तालुका अध्यक्ष शिवाजी जाधव, संतोष पाटील, गणेश सूर्यवंशी, सुनिल जगताप,पिंटू पवार, सुखदेव शेंडेकर, गोपिनाथ वराडे, पृथ्वीराज भोसले, आण्णा सरवळे, लक्ष्मण गवळी, चंद्रकांत निकम, राहुल जगताप, महेश बिस्किटे, आनंद भोई, पंडित गव्हाणे, आण्णा निकम, राहुल डोके, आदि मोरे,दिलीप जगताप, विष्णु घुले, संदिप पाटील, दत्ता पाटिल, कैलास विभूते, म्हाळाप्पा कोळी व जनहित वाहतूक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment