कै .गुरूवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके ४१ वा स्मृतीसमारोह व जन्मशताब्दी निमित्त राज्यस्तरीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 10, 2022

कै .गुरूवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके ४१ वा स्मृतीसमारोह व जन्मशताब्दी निमित्त राज्यस्तरीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात

 कै .गुरूवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके ४१ वा स्मृतीसमारोह व जन्मशताब्दी निमित्त राज्यस्तरीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात

     सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्यसेनानी, सांगोला तालुक्यात माध्यमिक शिक्षणाची सुविधा सर्वप्रथम प्रदान करणारे शिक्षणमहर्षि व सांगोला, नाझरा, कोळा विद्यामंदिर प्रशालेचे जनक कै. गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके ४१ वा.स्मृतीसमारोह व जन्मशताब्दी  विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.


    यामध्ये दि.११ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२२ रोजी राज्यस्तरीय कुमार कुमारी बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे.या स्पर्धचे उद्घाटन आमदार ॲड शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते व आमदार सचिन कल्याणशेट्टी(अक्कलकोट) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा.आमदार दिपकआबा साळूंके-पाटील, शिवरत्न शिक्षण संस्था अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील,स्वामी समर्थ सुतगिरणी चेअरमन राजशेखर शिवदारे, महानंदा दूध संघ संचालक चंद्रकांत देशमुख व महा बास्केटबॉल समिती अध्यक्ष डॉ. धनंजय वेलुकर, सचिव शत्रूघ्न गोखले खजिनदार जयंत देशमुख व मान्यवरांच्या उपस्थितीत  आज दुपारी ठीक ४.०० वा.सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे होणार आहे.या स्पर्धेमध्ये गडचिरोली ते मुंबई पासून ३० जिल्ह्यातून ३० मुलांचे व ३० मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू, आंतरराष्ट्रीय  नामांकित पंच उपस्थित राहणार आहेत तसेच  बास्केटबॉल स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ दि.१५ सप्टेंबर २२ रोजी सायं.५ .००वा. महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे  अध्यक्ष मा. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते व मा. प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सांगली जि.प.सदस्य शरदभाऊ लाड व प्रांत ३२३४ड१ प्रथम उपप्रांतपाल ला.भोजराज नाईक निंबाळकर व इतर मान्यवरांची उपस्थिती आहे.


   तसेच शुक्रवार दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७.०० वा.समाधी दर्शन,व ८.०० वा.सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे तैलचित्र पुष्पहार अर्पण व ४.०० वाजता कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके जन्मशताब्दी वर्ष व ४१ स्मृती समारोह सांगता समारंभ 


प्रमुख पाहुणे प्रसिद्ध वक्ते, साहित्यिक यशवंत पाटणे व प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचे अध्यक्षतेखाली  संपन्न होणार आहे.यामध्ये कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके  जिल्हास्तरीय गुणवंत  शिक्षक  पुरस्कार वितरण  होणार आहे.


कै. गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या स्मृतीसमारोह निमित्त गेली ४० वर्ष पुरुषांच्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे  आयोजन केले जाते यावर्षी राज्यस्तरीय कुमार- कुमारी गट बास्केटबॉल अजिंक्य स्पर्धा सांगोले शहरात होत आहेत याचा मनस्वी आनंद होत आहे. या स्पर्धेसाठी मैदानापासून स्पर्धकांना सर्व सुविधा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने देण्याचा आमचा प्रयत्न असेल..

-प्रा.प्रबुद्धचंद्र झपके

अध्यक्ष सां.ता.शि.प्र.मंडळ,सांगोला

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages