कै.विठ्ठलराव शिंदे समाजाची सेवा करण्याचा वसा घेतलेलं नेतृत्व- खा.शरद पवार
विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पवारांच्या हस्ते उद्घाटन
.png)
कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- ज्या काळामध्ये विठ्ठलराव शिंदे आमदार होते त्यावेळी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत होतो 1972 च्या काळामध्ये माझ्याकडे या जिल्ह्याचं पालकमंत्री पद होत अतिशय कठीण काळ होता. दोन वेळच अन्न खायचं असेल तर दुष्काळी काम करावी लागायची अशा कठीण परिस्थितीत विठ्ठलराव शिंदेसारखं या तालुक्यामध्ये होत त्यामुळे लोक जगले,जनावर जगली,माणसं जगली असे गौरोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी काढले.कुर्डुवाडी पंचायत समितीच्या आवारात माढा तालुक्याचे माजी आमदार व पंचायत समितीचे पहिले सभापती कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलताना पवार म्हणाले की तालुक्यातील चांगले काम करणाऱ्या प्रत्येकाला हा पुतळा नेहमी प्रेरणा देत राहील.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री तथा माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे होते.आपल्या अध्यक्षीय भाषणात मुंडे यांनी कै.विठ्ठलराव शिंदे यांच्या कार्याबरोबर आमदार बबनराव शिंदे यांच्या कार्याचेही भरभरून कौतुक केले.
यावेळी माजी आमदार विनायक पाटील यांनी पुतळा उभारण्यात आल्याने सर्वात जास्त मला आनंद झाला असल्याचे सांगत विठ्ठलराव शिंदे यांच्या कार्याला उजाळा दिला.
याप्रसंगी आमदार बबनराव शिंदे,संजयमामा शिंदे, पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार अरुण लाड,जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे,कल्याणराव काळे,अभिजित पाटील,मनोहर सपाटे,माजी सभापती विक्रमसिंह शिंदे, माढा वेलफेअरचे धनराज शिंदे, मनोहर सपाटे,निरंजन भूमकर,विश्वास बारबोले, सुभाष गुळवे, अप्पासाहेब झांजुर्डे,नागेश फाटे,माजी उपसभापती प्रतापराव नलवडे,धनाजी जवळगे,डॉ.राजेंद्र दास,युवा नेते अमोल नलवडे,डॉ.आशिष रजपूत,सचिन देशमुख,लालासाहेब मोरे,राजु जाधव अमोल नवले,अण्णा झिंजे यांच्यासह पत्रकार,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार संजयमामा शिंदे यांनी केले तर आभार रणजितसिंह शिंदे यांनी मानले.
आमदार बबनराव शिंदे यांच्या कार्यावरील पुस्तकाचे प्रकाशन
यावेळी आमदार बबनराव शिंदे यांच्या कार्यावर जेष्ठ पत्रकार सुरेश शहा यांनी लिहलेल्या "बबनराव शिंदे आमदारकीचा दस्तऐवज" या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार बबनराव शिंदे यांना अश्रू अनावर अन सभागृहात शांतता..
आपल्या भाषणाच्या शेवटी
"लोकशाहीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान,सगळ्याच लोकांनी आमच्या घराण्यावर प्रेम केलं त्याबद्दल मी आपलं कधीही उपकार विसरणार नाही"असे म्हणत आमदार बबनराव शिंदे यांना अश्रू अनावर झाले यावेळी सभागृहात निव्वळ शांतता पसरली होती.

No comments:
Post a Comment