बॉस जवळ दिलेले 10 हजार आणि राहिलेले पाच असे पंधरा हजार आज द्या," दोन दिवस वाळू वाहतूक बंद ठेवा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 17, 2022

बॉस जवळ दिलेले 10 हजार आणि राहिलेले पाच असे पंधरा हजार आज द्या," दोन दिवस वाळू वाहतूक बंद ठेवा

 बॉस जवळ दिलेले 10 हजार आणि राहिलेले पाच असे पंधरा हजार आज द्या," दोन दिवस वाळू वाहतूक बंद ठेवा


सांगोला पोलीस स्टेशनचा वसूलदार आणि वाळू माफिया यांचेतील कॉल रेकॉर्डिंग होतेय व्हायरल.

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- रात्री काम केले नाही, नाही केले, कोळा अर्बन बँकेत माझा भाऊ आहे, तुम्ही कुठे आहात, तिथे पाठवून देतो,बॉस जवळ दिलेले 10 हजार राहिलेले पाच हजार आणि बिराचे राहिलेले चार हजार आज पाठवून द्या,हो साहेब बिराला विचारून पाठवून देतो,हे संभाषण आहे, सांगोला पोलिस स्टेशनच्या वसुलदार आणि वाळू माफियाचे. सद्या हे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. काही न्यूज पोर्टल नी ही बातमी प्रकाश झोतात आणताच याच वसुलदार पोलिस पट्टाने सबंधित पत्रकाराविरोधात आकांड तांडव एक करून दमबाजीची भाषा केल्याचे समजत आहे. तुला बघून घेण्याची भाषा सुद्धा केल्याचे ऐकावयास मिळत आहे. चोर तो चोर आणि वर शिरजोर असाच तोरा संबंधित वसुलदाराचा असल्याचे दिसून येत आहे.

           सर्व पोलीस कर्मचारी खाकी गणवेशात , माञ या वसुलदाराच्या  डोळ्याला गॉगल, पायात शूज आणि स्टार्चची खादीची कपडे असा पेहराव घालून नेहमीच कर्तव्यात कसूर करणाऱ्या या पोलिस कर्मचाऱ्यावर कोणाची मेहेरबानी आहे?हा प्रश्न नागरीकांना पडलेला आहे. या वसूलदार पोलिसांवर पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील कोणती कारवाई करणार?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

            राज्य सरकारने अवैध वाळू वाहतूक बंद करण्यासाठी प्रशासनाला विविध उपाय योजना करण्याकामी सूचना दिल्या आहेत.पण रक्षकच अवैध धंद्यांना पायबंद घालण्याऐवजी सहकार्य करून आर्थिक मिलीभगत करीत असतील, कायद्याचा धाक राहणार कसा? असा ही प्रश्न नागरीकांना पडलेला आहे. अशा पोलिस वसुलदार कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते, राजकिय पक्षाचे पदाधिकारी पत्रकार,पोलीस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक यांना भेटून लेखी निवेदनातून करणार असल्याचे समजत आहे.

सांगोला पोलीस स्टेशनची दप्तर तपासणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते सांगोला येथे आल्या असताना पत्रकारानी वाळू वाळू माफियाकडून वसूली गोळा करीत असल्याची तक्रार केली होती, त्यावेळी सातपुते यांनी ठोस पुरावा द्या अशा पोलिसांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता.या व्हायरल रेकॉर्डींगच्या आधारे काय कारवाई करणार?हे पहावे लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages