सांगोल्याचे सुनिल वाघमारे यांचेकडे जिल्ह्याची जबाबदारी
.jpg)
सांगोला (कटूसत्य वृत्त):- दि. 28 ऑगस्ट रोजी समता विहार ओल्ड सांगवी, पुणे येथे झालेल्या कराटे असोसिएशन ऑफ इंडिया स्पोर्ट्स कराटे डो असोसिएशन महाराष्ट्र यांच्यामार्फत महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रतिनिधीची निवड करण्यात आली. यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या प्रमुखपदी सुनिल वाघमारे यांची निवड करण्यात आली. यावेळी वाघमारे सरांकडे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी सांगोल्यातील पहिला राष्ट्रीय कराटे पंच निजेंद्र चौधरी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment