सह्याद्री फार्मसीमध्ये जल्लोषात झाले श्री गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी,मेथवडे या महाविद्यालयात गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करीत,वाजतगाजत सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.प्रथमतः गणेश बाप्पाची मूर्ती वाजतगाजत महाविद्यालयात आणण्यात आली त्यानंतर विधिवत पूजा चि.विश्वजित दिलीपकुमार इंगवले यांच्या हस्ते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले सर,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,विद्यार्थिनी,पालक यांच्या उपस्थितीत झाली.विद्यार्थ्यांनी श्री गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी जोरदार तयारी केली होती त्यात आकर्षक स्टेज,रंगीबेरंगी सजावट,लक्ष्यवेधून घेणाऱ्या रांगोळ्या काढल्या होत्या.तसेच मोबाईलमुळे जीवनपद्धतीत झालेला बदल चित्रित करणारे पोस्टर्स व प्रतिकृती विद्यार्थ्यांनी बनवले होते त्यांचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी "मोरया मोरया गणपती बाप्पा मोरयाच्या" जयघोषाने परिसर दणाणून सोडला.महाविद्यालयातर्फे सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय सांस्कृतिक विभागाचे प्रा.आर.एम.कोळी,प्रा.पी.एम.आडत व सर्व विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.
No comments:
Post a Comment