मोहोळ तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन संपन्न

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- आपल्यातील अमर्यादित क्षमतांचे ओळख करून स्वतःतील अद्वितीय गुणवत्ता ओळखून भविष्यातील संधी भविष्यातील धोके स्वतः ओळखून स्किल कशा डेव्हलप करता येईल यासाठी 100% रिझल्ट मिळेल असे प्रतिपादन मुंबईचे प्रसिद्ध फोटोग्राफर विकास इंगळे यांनी केले.मोहोळ तालुका फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
ओरिएंटल कार्यशाळा मोहोळ येथे पार पडली यावेळी ते बोलत होते.
मोहोळ तालुका फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन हॉटेल शुभम येथे घेण्यात आले होते प्रोफेशन फोटोग्राफर होताना येणाऱ्या अडथळ्यांना ओळखुन त्यावर मात करण्यासाठी शास्त्र शुद्ध परिणामासाठी या कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी विकास इंगळे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मोहोळ तालुका फोटोग्राफर असोशिएशनचे अध्यक्ष महेश बनसोडे महासंघ सचिव हे होतो यावेळी बालाजी पवार बालाजी माने महेश बनसोडे दत्ता शिंदे गोविंद मादास पुरुषोत्तम वग्गा राजेश कटवुधोंड स्वप्निल मर्दा रविंद्र गोगी प्रविण थोरात आनंद पुकाळे प्रशांत उडता रवि सलगर यांचा उत्कृष्ठ फोटोग्राफर म्हणुन सत्कार करण्यात आला
तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे रामदास गरगडे रमेश नगरे बाळासाहेब विभुते गणेश गोफणे दयानंद स्वामी राजु पवार सुधीर डोके हरिभाऊ नगरे आदी सह अनेकजन उपस्थित होते हजार शब्दात जे सांगता येत नाही ते एका छाया चित्रातुन व्यक्त होते
फोटोग्राफीमध्ये आपला ब्रँड कसा क्रिएट करावा फोटोग्राफी करत असताना प्रोफेशनल फोटोग्राफरचा माईंडसेट कसा असावा या आणि अशा असंख्य गोष्टींचा फोटोग्राफरला माहिती यावेळी देण्यात आली तालुक्यातील अनेक जण यावेळी उपस्थित होते, शेवटी आभार प्रदर्शन रामदास गरगड़े यानी मानले.
No comments:
Post a Comment