सह्याद्री फार्मसीमध्ये जल्लोषात झाले श्री गणपती बाप्पाचे विसर्जन

सांगोला (कटूसत्य वृत्त):- सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी,मेथवडे या महाविद्यालयात "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या"असा जयघोष करीत,वाजतगाजत सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले.प्रथमतः गणेश बाप्पाची विधिवत पूजा व आरती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले सर, संस्थेच्या सचिवा सौ.सुवर्णा दिलीपकुमार इंगवले यांच्या हस्ते व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,विद्यार्थि नी,पालक यांच्या उपस्थितीत झाली. सर्वानी श्री गणेशाची पाच दिवस मनोभावे पूजा करून परिसर भक्तिमय केला व बाप्पास निरोप देण्यात आला .विद्यार्थ्यांनी श्री गणेशाच्या विसर्जनाची जोरदार तयारी केली होती त्यात आकर्षक स्टेज,रंगीबेरंगी सजावट,लक्ष्यवेधून घेणाऱ्या रांगोळ्या काढल्या होत्या.गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीचा सर्व विद्यार्थ्यांनी आनंद घेतला,वाजत गाजत ,गुलाल उधळत तसेच विविध मराठी,हिंदी गाण्यावर लक्षवेधक नृत्य करत ठेका धरला.विद्यार्थ्यांनी "मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया","गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशा जयघोषाने परिसर दणाणून सोडला. सह्याद्री महाविद्यालयातर्फे सर्व उपस्थितांना प्रसाद व अल्पोपहार देण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय सांस्कृतिक विभागाचे प्रा.पी.एम.आडत,प्रा.आर.एम.कोळी ,,प्रा.भारत गरंडे व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.
No comments:
Post a Comment