सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर अपघात; १ ठार, ६ जखमी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 12, 2022

सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर अपघात; १ ठार, ६ जखमी

 सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर अपघात; १ ठार, ६ जखमी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील लिंबीचिंचोळी गावाच्या परिसरात सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्यातील खासगी बस उलटून झालेल्या अपघातात एक ठार तर सहा प्रवासी जखमीझाले आहेत. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

अक्कलकोट महामार्गावरील लिंबीचिंचोळी गावाच्या परिसरात पहाटेच्या सुमारास कर्नाटक राज्यातील खासगी बस उलटून झालेल्या अपघातात एक ठार तर सहा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अक्कलकोट मधील श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेऊन हे भाविक सोलापूरकडे परतत असताना हा अपघात झाला आहे.

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बसमधील जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पुढील तपास वळसंग पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages