राज्यस्तरीय बास्केट बॉल स्पर्धेत औरंगाबाद, मुंबई सिटी, ठाणे, रत्नागिरी, अहमदनगर संघानी जिंकली प्रेक्षकांची मने. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 12, 2022

राज्यस्तरीय बास्केट बॉल स्पर्धेत औरंगाबाद, मुंबई सिटी, ठाणे, रत्नागिरी, अहमदनगर संघानी जिंकली प्रेक्षकांची मने.

 राज्यस्तरीय बास्केट बॉल स्पर्धेत  औरंगाबाद, मुंबई सिटी, ठाणे,  रत्नागिरी, अहमदनगर  संघानी जिंकली प्रेक्षकांची मने



नेटके नियोजन, सुसज्य मैदानाने खेळाडूमध्ये वाढतोय जोश

सांगोला (कटूसत्य वृत्त):- कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके 41 वा स्मृतिदिन आणि जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित  राज्यस्तरीय  कुमार-कुमारी बास्केटबॉल स्पर्धेची सांगोला विद्यामंदिर येथे उत्साहात सुरूवात झाली असुन, पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये मुलांच्या औरंगाबाद , अमरावती, मुंबई सिटी आणि ठाणे, रत्नागिरी अहमदनगर, अकोला वाशिम तर मुलींच्या नागपूर  ठाणे, पुणे कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, पुणे सातारा आदी संघाच्या प्रेक्षणीय लढती झाल्या.   मुलींच्या आणि मुलांच्या संघाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. राज्यस्तरीय कुमार कुमारी बास्केट बॉल सामने हे सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत  प्रकाश झोतात खेळविले जात असून अत्यंत चुरशीचे सामने होत आहेत.
            स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शिवरत्न शिक्षण संस्थेचे तथा सोलापूर शहर व जिल्हा अमुचेर बास्केट बॉल असोशियनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी   शितलदेवी  मोहिते पाटील यांनी स्पर्धा ठिकाणाला भेट देवून संयोजन समितीचे उत्कृष्ठ  संयोजनाबद्दल अभिनंदन केले. आपल्या मनोगतातून त्यांनी कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या 41 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजीत ही बास्केट बॉल स्पर्धा राज्यभरातील स्पर्धकांना अनुभवाची शिदोरी देत आहे.अनेक खेळाडूंना सांगोला सारख्या स्पर्धेतून,राष्ट्रीय अंतराष्ट्रीय स्पर्धेत चुणूक दाखविण्याची संधी मिळणार आहे, आणि ही संधी झपके कुटुंबीय आणि सां. ता. शि. प्र. मंडळ मिळवून  देत आहे . याचा मला अभिमान वाटत आसल्याची भावना शेवटी धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी सांगोला पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले आणि रवी राजुलवार उपस्थित होते.
          दोन दिवसांत जवळपास 60 हून अधिक  सामने झाले आहेत. विद्यामंदिरच्या प्रांगणातील या सामन्यासाठी सांगोला शहरातील नामांकित डॉकटर, उद्योगपती, आजी माजी नगरसेवक, विविध क्षेत्रातील अधिकारी भेट देवून सामन्याचा आनंद लुटत आहेत. सदर स्पर्धेचे सुत्रसंचलन स्पर्धा समन्वयक सुनिल भोरे,क्रीडा शिक्षक प्रा. डी.के.पाटील यांनी केले.13 आणि 14 सप्टेंबरला सांगोलकरांना रोमहर्षक लढती पहावयास मिळणार आहेत. सदर स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यामंदिर परिवारातील प्रशासकीय स्टाफ, असोसिएशनचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages