येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाज प्रशासनाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही;सुनील ओहोळ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 1, 2022

येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाज प्रशासनाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही;सुनील ओहोळ

 येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाज प्रशासनाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही;सुनील ओहोळ

बहुजन सत्यशोधक संघाचा पंढरपूर तहसीलवर निषेध मोर्चा

कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):-बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयावर बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चात बहुजन समाजातील बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ म्हणाले की एससी.एसटी वर होणारा अन्याय अत्याचार खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे.आपण देशामध्ये 75 वा सुवर्ण अमृत महोत्सव साजरा करत असताना काँग्रेस,बीजेपीने आत्मचिंतन करण्याची गरज आहे.राजस्थानातील इंद्रजीत मेघवाल या नऊ वर्षाच्या मुलाची  ज्या शिक्षकाने मटक्यातील पाणी प्यायला म्हणून हत्या केली देशांमधील कुठल्याही पक्षाने याचा साधा निषेधही केला नाही. त्या सर्व पक्षाचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो.त्या शिक्षकाला फाशीची शिक्षा दिली पाहिजे.औरंगाबाद येथील जनार्दन कासार निर्घृण हत्याकांड करणाऱ्या जातीवादी गावगुंडावर 302/ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई झाली पाहिजे.मौजे भंडारकवठे तालुका दक्षिण सोलापूर येथील दिनेश कांबळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या गावगुंडावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे.ओबीसीची जातीनिहाय जनगणना जनगणना तात्काळ करावी.धनगर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा.देशामध्ये होणारे खाजगीकरण तात्काळ थांबवावे. विनायक मेटे यांचे घातपात की अपघात याची सीबीआय मार्फत चौकशी करावी,पाठ्यपुस्तकावर जीएसटी लावून बहुजनांना गुलाम बनवण्याचे जातीवादी षडयंत्र आहे.परंतु कितीही षडयंत्र केले तरी बहुजन समाज फुले, शाहू ,आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर चालणारा समाज आहे.येणाऱ्या काळामध्ये शासन प्रशासनाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा ज्योती भुजंगे,उपाध्यक्ष नितीन वाघमारे,जिल्हाध्यक्ष गणेश देवकते,युवक जिल्हाध्यक्ष भैयासाहेब पालखे,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद लोंढे,डॉ.कुमार लोंढे, अरुण चंदनशिवे,तालुकाध्यक्षा पूजा झरकर, पुष्पा जगताप तालुका उपाध्यक्ष, अंभोरे मॅडम,बहुजन कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब शिंदे,रिपब्लिकन कर्मचारी फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष डॉ.यू.एफ जानराव,बहुजन ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे, पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रल्हाद सुर्वे,टेंभुर्णी शहराध्यक्ष रोहित जगताप,करमाळा तालुकाध्यक्ष प्रवीण तूपसमिंदर,शंकर गायकवाड सर, नितीन गायकवाड सर, ऋषिकेश वाघमारे,सर्वजित लोंढे, बापूसाहेब लोंढे जिल्हा उपाध्यक्ष, बाळासाहेब झेंडे, तुकाराम बनसोडे, विलास लोंढे, दीपक पाटोळे,अमित ओहोळ,भूषण जाधव,प्रताप रणदिवे, सारंग ओहोळ,उल्हास खरे,गायत्री रंधवे बनबाई खवळे,विश्रांती कसबे, सीता कांबळे,ऋषिकेश रंधवे,प्रशांत कांबळे,बहुजन समाजातील युवक,महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages