सांगोला मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास - आमदार शहाजीबापू पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 1, 2022

सांगोला मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास - आमदार शहाजीबापू पाटील

 सांगोला मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास - आमदार शहाजीबापू पाटील

८ कोटी ४५ लाख रुपये निधीच्या रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न

सांगोला (कटूसत्य वृत्त):- आमदार शहाजीबापू पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या मार्च अर्थसंकल्पामध्ये मंजूर असणाऱ्या  व नाबार्ड मधून मंजूर असणाऱ्या  १)एखतपुर चांडोलेवाडी गोडसेवाडी रस्ता प्रतिमा १९५ किमी०३/००ते ०७/५०० मध्ये सुधारणा करणे मंजूर निधी २कोटी २०लाख,२) चिणके बलवडी रस्ता प्रजिमा १६५किमी ०६/००ते ०९/५००मध्ये सुधारणा करणे मंजूर निधी १ कोटी २५ लाख ३) लोटेवाडी सोनलवाडी एखतपूर व  मेडशिंगी आलेगाव वाकी घेरडी रस्ता  रामा ३८६किमी ०५/३००ते ०९/००,२४/००ते २६/३००आणि ३८/२००ते ४०/२००मध्ये सुधारणा करणे मंजूर निधी  ०१.५०कोटी.४) भाळवणी महीम महूद रस्ता 
प्रजिमा ८१किमी ६८/००ते ७२/५०० मध्ये सुधारणा करणे मंजूर निधी २कोटी ५) वाकी हलदहिवडी  रस्ता रामा ३९६ किमी १९/०० ते२२/०० मध्ये सुधारणा करणे मंजूर निधी  १कोटी ५०लाख या कामांची भूमीपूजन कार्यक्रम चांडोलेवस्ती सांगोला, चिणके, लोटेवाडी, महुद, वाकी या ठिकाणी करण्यात आले आमदार  शहाजीबापू पाटील २०१९ विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यापासून सांगोला तालुक्यामध्ये विकासाची गंगा वाहते आहे सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी भरघोस निधी  आमदार शहाजीबापू पाटील यांच्या माध्यमातून आल्याने मोठ्या प्रमाणावर विकासाची विविध कामे चालू आहेत अपूर्ण असणाऱ्या रखडलेल्या उपसा सिंचन योजना साठी भरपूर मोठ्या प्रमाणावर निधी आल्याने  सर्व सिंचन योजनेचे कामे चालू आहेत त्याचबरोबर  सांगोला येथे सर्व सोयीयुक्त अध्यावत विश्रामगृहाचे काम चालू आहे , सांगोला येथे  सर्वच कार्यालय एकत्र येण्यासाठी प्रशासकीय इमारतीसाठी ही मंजूर आहे नगरपालिका प्रशासकीय कार्यालयासाठी सुद्धा निधी मंजूर असून लवकरच तेही काम मार्गी लागणार आहे दुय्यम निबंधक  कार्यालयाचे काम पूर्ण झाले असल्याने ते नागरिकांना सोयीचे झाले आहे त्याचबरोबर सांगोला तालुक्यातील रस्त्यांच्या व पुलाच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून घेतला आहे या मुळे सांगोला तालुक्याचा चौफर विकास होत असलेल्या पहावयास मिळत आहे
 मंजूर असलेल्या या कामांचे   काल आमदार शहाजीबापू पाटील, युवा नेते  यशदादा साळुंखे-पाटील , प्रा प्रबुद्धचंद्र झपके,भाऊसाहेब रुपनर, बाबुराव गायकवाड, तानाजीकाका पाटील, प्रफुल कदम, चेतनसिंह केदार, सुभाष इंगोले शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, सुनील भोरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम उपभियांता  अशोक मुलगीर या मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये भूमिपूजन संपन्न झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages