सांगोल्याचा भूषण नीलकंठ खंदारे जेईई परिक्षेत देशात 172 वा

सांगोला (कटुसत्य वृत्त): न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज चा इयत्ता बारावी शास्त्र शाखेचा भूषण नीलकंठ खंदारे हा विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात (S.C.)मध्ये भारतात 172 वा क्रमांक मिळवून यशस्वी झाला आहे. न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज सांगोला व सांगोला तालुक्याच्या इतिहासात तो पहिल्याच प्रयत्नात (First Attempt) जेईई ॲडव्हान्स 2022 या परीक्षेमध्ये यशस्वी झाला आहे.
या परीक्षेसाठी संपूर्ण भारतातून 12000 विद्यार्थी निवडले जातात.यापैकी जनरल मेरिट लिस्ट मध्ये सात हजार रँक व अनुसूचित जातीमध्ये 172 वा रँक मिळवला आहे, त्यामुळे त्याच केंद्रसरकारच्या देशातील प्रतिष्ठीत असणार् या भारतीय प्रौद्योगिकी संस्था - I.I.T. (आय.आय.टी.)मध्ये बी.टेक. साठी त्याचा प्रवेश निश्चित झाला आहे. या त्याच्या यशाबद्दल सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था उपाध्यक्ष,संस्था सचिव सर्व संस्था सदस्य, जुनियर कॉलेज चे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले व भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या त्याच्या यशाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment