राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरदचंद्र पवार यांची फेरनिवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, September 11, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरदचंद्र पवार यांची फेरनिवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरदचंद्र पवार यांची फेरनिवड

ॲड. विष्णू तापकीर यांचे तर्फे निवडीचे स्वागत

               आळंदी (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी माजी कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांची फेर निवड जाहीर करण्यात आली. या निवडीची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी निवडीचे स्वागत करून अभिनंदन केले आहे.

               या संदर्भात ॲड. तापकीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे व पक्षाचे मेल वर मेल करून स्वागत व अभिनंदन केले आहे. या संदर्भात अधिवेशन समितीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी अधिवेशन दिल्लीत ताल कटोरा स्टेडियमध्ये सुरु आहे. या राष्ट्रीय कार्य समितीच्या बैठकीत पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.

               शरद पवार यांच्या नेतृत्वात या देशामध्ये पुरोगामी, धर्मनिरपेक्ष सर्वसमावेशक विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प देखील करण्यात आला आहे. 

               यावेळी चऱ्होलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेठे वाटून या निवडीचे जल्लोषात स्वागत केले. या प्रसंगी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, शिक्षक सेलचे अध्यक्ष प्रा. संदीप तापकीर, युवा नेते प्रदीप आबा तापकीर, ॲड.मयूर तापकीर, भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्योती तापकीर, नरेंद्र बंटी तापकीर, विकास बुर्डे, अनिल तापकीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages