माहिती गतिमान मिळण्यासाठी माहिती अधिकार कायदा महत्त्वाचा आहे... शिवाजीराव पवार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-प्रशासनामध्ये सर्वसामान्य लोकांचा सहभाग वाढावा नागरिकांच्या सूचना प्रशासन गतिमान करण्यासाठी उपयोगाच्या आहेत म्हणून माहिती अधिकार कायद्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे असे प्रतिपादन यशदाचे राज्यस्तरीय प्रशिक्षक शिवाजीराव पवार यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजीव गांधी गतिमानता या कार्यक्रमाच्या कार्यशाळेत बोलत होते .कार्यक्रमाचे उद्घाटन ते जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कोळी साहेब उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील माहिती अधिकार कायद्याच्या प्रत्येक अर्जाला सकारात्मक उत्तर देऊन नागरिकांना अभिलेख पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले तर माहिती अधिकार कायद्याचे येणारे अर्जांचे प्रमाण कमी होईल की ज्यामुळे लोकांचा विश्वास प्रशासनावरील वाढेल तसेच आलेले अर्जाची योग्य नोंदवही ठेवून नागरिकाला त्वरण माहिती द्यावी अशी ही प्रतिपादन पवार यांनी बोलताना पुढे केले ते म्हणाले माहिती अधिकार कायदा हा सामान्य माणसाचा माहिती मिळवण्याचं हत्यार असल्यामुळे कायद्याची मोठ्या प्रमाणामध्ये जाणीव जागृती झाली आहे सोलापूर जिल्हा परिषदे मधल्या कोणत्याही विभागांमध्ये अर्ज पेंटिंग राहणार नाही याची काळजी त्या त्या विभाग प्रमुखांनी घेतली पाहिजे असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी बोलताना दिले ते बोलताना पुढे म्हणाले की कायद्याला घाबरण्याचे कोणतेही कारण नाही कारण नागरिकांचा हक्क नागरिक मूलभूत असतात आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचं काम माहिती देऊन केलं पाहिजे तेव्हा माहिती अधिकार कायदा लोकांमध्ये जास्तीत जास्त पोहोचला जाईल लोकांना माहिती खुली केल्याने अर्जांचे प्रमाण कमी होईल कायद्याची कोणतीही भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही कायद्यातील तरतुदी समजून घेतल्या पाहिजेत. या कार्यशाळेला जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन पाणीपुरवठा विभागाचे अविनाश गोडसे यांनी केले.

No comments:
Post a Comment