प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने एकदिवसीय आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन

प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी दिली माहिती
अकलूज (कटुसत्य वृत्त):- कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर अकलूज यांचे वतीने रविवार दि २१ रोजी एकदिवसीय पुरुषांच्या खुल्या गटातील भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु . स्वरुपाराणी मोहिते - पाटील यांनी दिली.
ग्रामीण खेळाचे जतन व्हावे , ग्रामीण खेळाला प्रोत्साहन मिळावे या हेतूने प्रताप क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते - पाटील यांनी नेहमीच ग्रामीण खेळाचे जतन करुन तरुण पिढीला या खेळांचे महत्व पटवून दिले आहे.तरुणाई तंदुरुस्त रहावी व ती बलशाही व्हावी या प्रमुख हेतूने तसेच या तरुणाईच्या हातून देशसेवा घडावी हा हेतूही स्पर्धेचा आहे.विजयसिंह मोहिते - पाटील क्रीडा संकूल , अकलूज येथे सदर स्पर्धेचे आयोजन केले असून सदरची स्पर्धा एकदिवसीय व बाद पध्दतीने खेळविली जाणार आहे . स्पर्धेसाठी २ मैदाने व सुमारे ६० तज्ञ पंच कार्यरत आहेत . स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रुपये २१,००० / - व चषक , द्वितीय पारितोषिक रोख रु . १५,००० / - तृतीय पारितोषिक रोख रु . १०,००० / - व चौथे पारितोषिक रोख रु . ५,००० / - असे ठेवण्यात आले आहे . या स्पर्धेचे उद्घाटन अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते - पाटील यांचे हस्ते रविवार दि २१ रोजी सकाळी १० वा . होणार असून स्पर्धेचा समारोप याच दिवशी सायंकाळी ८ वा . स.म.शंकरराव मोहिते - पाटील सह . साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते - पाटील यांचे हस्ते होणार आहे . या स्पर्धेसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते - पाटील व प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु . स्वरुपाराणी मोहिते - पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत . या स्पर्धेत माळशिरस , पंढरपूर , सांगोला , मंगळवेढा , बार्शी , इंदापूर , माढा , करमाळा आदी तालुक्यातून सुमारे ५० संघ व या संघातून सुमारे ४०० खेळाडू सहभागी होणार आहेत.संघाची नावनोंदणी ९ ८६०३३१७१७ / ९ ३२५२५२ ९९ ६ / ९ ४२०७८ २३२३ या नंबरवर दि २१पर्यंत सकाळी ९ वाजेपर्यंत करता येणार आहे.खेळाडूंच्या भोजनाची व्यवस्था मंडळामार्फत करण्यात येणार आहे . या स्पर्धेत संघांनी सहभागी होवून स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे सचिव पोपटराव भोसले - पाटील यांनी केले आहे . यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील , खजीनदार वसंतराव जाधव , सर्व संचालक , स्पर्धा प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते . या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्ञानेश्वर माने - देशमुख , यशवंत माने - देशमुख , भिमा शंकर पाटील , संजय राऊत , अरविंद वाघमारे व सर्व क्रीडा शिक्षक व कारखान्याचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत .
No comments:
Post a Comment