उद्योजक अमोलशेठ गाढवे यांच्या वाढदिवसा निमित्त २७५ वृक्षाचे वृक्षारोपण साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 19, 2022

उद्योजक अमोलशेठ गाढवे यांच्या वाढदिवसा निमित्त २७५ वृक्षाचे वृक्षारोपण साजरा

उद्योजक अमोलशेठ गाढवे यांच्या वाढदिवसा निमित्त २७५ वृक्षाचे वृक्षारोपण साजरा

              लोणी काळभोर (कटुसत्य वृत्त):- तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर लोणी काळभोर येथील डोंगर परिसरात दि.१८ऑगस्ट २०२२ रोजी  धनलक्ष्मी डेवलपर्स चे मालक उद्योजक श्री. अमोलशेठ विलास गाढवे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण प्रसंगी वड,पिंपळ, चिंच, कडुलिंब, जांबुळ, बेल,लक्ष्मीतरू, खैर,उंबर, कंरज अशा   ६ फुटी २७५ देशी झाडे लावुण वाढदिवस साजरा करण्यात आला.

              या वेळी श्री.ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, ग्रीन फाऊंडेशन पुणेजिल्हा अध्यक्ष श्री. दत्तात्रय  शेंडगे, महेशशेठ थोरात, सचिनशेठ गाढवे, दादासाहेब गाढवे, पांडुरंग राखपसरे, तुषारशेठ वाघुले , शंतनु धुमाळ , साहिल मुलाणी ,तुषार शिंदे , संदिप राखपसरे, कृष्णा राखपसरे , सिद्धार्थ खंडागळे, हुमेसर, नानासाहेब देशमुख, बाबासाहेब घोडके, उपस्थित होते. वृक्ष हे आपल्या

              पर्यावरणाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहेत.  आपल्या अवती भोवत असणारी हि झाडे आपल्याला फक्त प्राणवायूच च देता इतर अनेक गोष्टीही देतात वृक्षांपासून आपल्याला सावली मिळते थोडक्यात एक प्रकारचा निवाराच मिळतो.वृक्ष एक प्रकारे आपले मित्रच आहेत. अनेक लोकांचा उदरनिर्वाह वृक्षांपासून पूर्ण होतो. म्हणजेच काही लोक झाडांची फळे विकून पैसे कमावतात व आपला उदरनिर्वाह करतात. तसेच आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी झाडे महत्त्वाची ठरतात. झाडांपासून मिळणारा स्वच्छ ऑक्सिजन आणि हवा आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी कारणीभूत ठरते. अनेक वृक्षांमध्ये तर औषधी गुणधर्म असतात त्यापासून विविध औषध बनवली जातात. थोडक्यात झाडांपासून आपल्याला नवीन जीवनदान सुद्धा मिळू शकते असे शंभुराजे प्रतिष्ठान चे शंतनू धुमाळ यांनी या वेळी त्यांनी सांगितले. तसेच ग्रीन फाऊंडेशन, शंभुराजे प्रतिष्ठान, वनविभाग लोणी काळभोर, वनव्यवस्थापन समिती, अमोलभाऊ गाढवे मित्र परिवार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages