शिंदे गटाला बसू शकतो धक्का?

मुंबई, (नासिकेत पानसरे):- शिवसेनेत दोन गट पडले. मात्र खरी शिवसेना कोणाची हे जरी जनतेला सर्वश्रृत असले तरी दोन गट पडल्याने सिवसेना नेमकी कोणाची याचा फेसला उद्या होणार आहे. शिवसेनेनं त्याआधी शिवसेनेनं आपली भूमिका कोर्टात मांडलेली आहे. आजही सुप्रिम कोर्टात शिवसेनेच्यावतीने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे आणि त्यावर झालेल्या युक्तिवादावरून शिंदे गट अडचणीत येण्याची चिन्ह आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर अपात्रेच्या कारवाईच्या मागणीवरुन मुळ शिवसेनेकडून करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर सुनावणी होणार आहे. त्याआधी शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शिंदे गटाकडून पक्षाविरोधी कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यांच्या कडून गैरकृत्य झालेले आहे. मात्र आपले कृत्य योग्य आहे हे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आरोप केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे आपले मतदार नाराज असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यात काही तथ्य आहे का, कारण हेच लोक अडीच वर्ष कॉग्रेस,राष्ट्रवादी साबत महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होते मंत्रीही राहिले आहेत. त्यावेळी अडीच वर्षात त्यांना कोणतीच अडचण नव्हती. आता शिंदे गट भाजपला आपला जुना मित्रपक्ष मानतो त्याच भाजपने शिवसेनेला कधीच समानतेची वागणुक दिलेली नाही. योग्य दर्जा दिला नाही, असेही शिवसेनेनं आपल्या उत्तरात स्पष्टपणे सांगितलं आहे. तसंच, महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले होते, त्यावेळी या आमदारांनी सर्व सोई आणि सुविधांचा आणि आर्थिक लाभाचे फायदे घेतला. त्यावेळी त्यांनी कधी आपल्या मतदारसंघातील जनता आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे अडीच वर्षात कधीही सांगितले नाही. जर हे लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी सरकार स्थापन केल्यामुळे इतकेच त्रस्त होते तर कॅबिनेटमध्ये सहभागी झाले नसते, अशी भूमिकाही शिवसेनेनं ठामपणे मांडण्यात आलेली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ३९आमदारांना घेऊन बंड केले.
आधी सुरत एक मुक्काम केला तिथे असुरक्षित वाटल्यामुळे आपला मुक्काम त्यांनी नंतर गुवाहाटीला हलविला होता. त्याचवेळी शिवसेनेकडून शिंदे गटाच्या १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावण्यात आली. या नोटीस विरोधात शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यावर सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिवसेनेतून फुटलेल्या बंडखोर शिंदे गटाने राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टातील तरतुदीनुसार अन्य पक्षात प्रवेश न केल्याने त्यांना अपात्र ठरवावे आणि त्यांच्या पाठिंब्यावर सत्तेवर आलेले सरकार घटनाबाह्य ठरवावे. या प्रमुख मागणीला अनेक गोष्टींना आव्हान देणारी याचिका शिवसेनेने केली आहे. अपात्रतेच्या नोटीसांना आणि अजय चौधरींच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणारी याचिका शिंदे गटाने दाखल केली आहे. यावर दोन्ही बाजूने आज कोर्टात जोरदार युक्तीवाद करण्यात आला. या दरम्यान झालेल्या युक्तीवादातून शिंदे गटाला धक्का बसेल का,की शिंदे गटाला एखाद्या पक्षात सामिल व्हावे लागेल की अपात्रतेची टांगती तलवार डोक्यावर पडली तर सरकार बेकायदेशीर ठरेल जर सरकार बेकायदेशीर ठरले तर या सरकारने घेतलेले निर्णयही बेकायदेशीर य़ठरतील का हे उद्याच्या निकालावरून स्पष्ट होईल.
No comments:
Post a Comment