१४ ते १६ ऑगस्ट या तिन दिवसीय मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदु शस्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा (कटूसत्य वृत्त):- राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त माढ्यात १४ ते १६ ऑगस्ट या तिन दिवसीय मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदु शस्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे नेते दादासाहेब साठे यांनी दिली.
माढ्यातील ग्रामीण रुग्णालयात शिबीर पडणार असुन जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती,जिल्हा परिषद आरोग्य विभाग व माढा ग्रामीण रुग्णालय यांच्या सहयोगाने पार पडणार असुन श्रीसंत कुर्मदास साखर कारखाना, क्रांती साठे बहुउद्देशीय शैक्षणिक क्रिडा विकास मंडळ,सहकार महर्षी कै. गणपतराव साठे प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर पार पडणार आहे.१४ ऑगस्ट रोजी नेत्रतपासणी होईल त्यानंतर मोतिबिंदु शस्रक्रिया पार पडेल. शिबीरात प्रख्यात नेत्रतज्ञ डाॅ.गणेश इंदुरकर,डाॅ.अशोक मेहता,डाॅ.चाकणे या नेत्र तज्ज्ञांकडून नेत्र तपासणी व मोतिबिंदु शस्रक्रिया केली जाणार आहे.यावेळी माजी आ.अॅड.धनाजीराव साठे,नगराध्यक्षा अॅड मीनल साठे,उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे,नगरसेवक अजिनाथ माळी यांचेसह नगरसेवक साठे प्रतिष्ठान चे कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment