भाजपच्या कार्यकर्त्यांनी आगामी निवडणूक काळात गावपातळीवरची बूथ यंत्रणा सक्षम ठेवावी - चेतनसिंह केदार-सावंत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 4, 2022

भाजपच्या कार्यकर्त्यांनी आगामी निवडणूक काळात गावपातळीवरची बूथ यंत्रणा सक्षम ठेवावी - चेतनसिंह केदार-सावंत

भाजपच्या कार्यकर्त्यांनी आगामी निवडणूक काळात गावपातळीवरची बूथ यंत्रणा सक्षम ठेवावी - चेतनसिंह केदार-सावंत

सांगोल्यात भाजपा बूथ कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न

                सांगोला (कटूसत्य वृत्त):-मेरा बूथ सबसे मजबूत हर बूथ भाजपा युक्तचा नारा देत भारतीय जनता पक्षाच्या सांगोला शहर व ग्रामीण भागातील बूथ कार्यकर्त्यांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मार्गदर्शन करताना त्यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना केंद्र आणि राज्य सरकारची उपलब्धी आणि जनाहिताची कामे जनतेपर्यंत पोचिविण्याचे आणि गाफील न राहता आगामी निवडणूक काळासाठी आपली गावपातळीवरची बूथ यंत्रणा सक्षम ठेवावी असे आवाहन केले. 

                माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढविण्यासाठी भाजपचे जिल्‍हा संघटन सचिव शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ यंत्रणा सक्षम करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी भाजपचे जिल्‍हा संघटन सचिव शशिकांत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक बुथवर सक्षम करण्याचे आवाहन केले.

                या बैठकीत मार्गदर्शन करताना भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मार्गदर्शन केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, मोदी सरकार आणि शिंदे- फडणवीस सरकारने चांगले काम केल्यानेच जनतेच्या मनातील सरकार सत्तेत आले आहे. भाजप कार्यकर्त्यांनी निरंतर कष्ट आणि मेहनत करावी म्हणजे आगामी काळात भाजपला आणखी चांगले दिवस येतील. श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांचे त्याग आणि परिश्रम हे भाजपला देशात इथपर्यंत पोचविण्यास कारणीभूत आहेत. विरोधी पक्षाच्या अपप्रचाराला ठोस उत्तर देऊन तो हाणून पाडावा असे आवाहन केले. केंद्र सरकारच्या सर्व योजना आपल्या भागातील जनसामान्य यांच्यापर्यंत पोहचल्या पाहिजेत याची खबरदारी घेण्याची जबाबदारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आहे, असे आवाहन त्यांनी केले.

                माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढवायची असेल तर सर्वांनी बूथ यंत्रणा सक्षम केल्या पाहिजेत. सर्व बूथ प्रमुखांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन भारतीय जनता पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी सरकारचे निर्णय यांची माहिती दिली पाहिजे. त्याचवेळी त्या निर्णयांची अंमलबजावणी होते किंवा नाही याची माहिती कार्यकर्त्यांनी मतदारांशी संवाद साधून घ्यावी. योजना पोहचत नसतील तर त्यांची जबाबदारी स्वीकारून सामान्य जनतेला मोदी सरकारच्या योजनांचा लाभ द्यावा, यासाठी आवश्यक कागदपत्रे यांची जमवाजमवदेखील बूथ प्रमुखांनी जबाबदारी स्वीकारून करायला हवी असे सूचनादेखील भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिल्या.

                यावेळी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुदर्शन यादव, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, गणेश ननवरे, गणेश कदम, अजित तवटे, राहुल होनमाने, विजयकुमार इंगोले, विकास वलेकर, विक्रम नवले, पांडुरंग यादव, महेश गुरव, भाऊ पाटील, दत्तात्रेय वलेकर, बाळासाहेब गाडे, संजय केदार, महेश घाडगे, रोहित घाडगे, विक्रम घाडगे, प्रवीण जानकर, सोयजीत केदार, रमेश विटेकर, अजित केदार, सौरभ फटे, राहुल केदार, दीपक केदार, बाळासो चव्हाण, गणेश केदार, औदुंबर केदार, रोहित सावंत, राजू शिंदे, मल्हार गायकवाड, अवधूत वलेकर, विनोद उबाळे, सिद्धेश्वर गाडे,विश्वास कारंडे,दीपक केदार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages