सह्याद्री फार्मसीच्या डी.फार्मसी विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षेत घवघवीत यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 4, 2022

सह्याद्री फार्मसीच्या डी.फार्मसी विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षेत घवघवीत यश

सह्याद्री फार्मसीच्या डी.फार्मसी विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षेत घवघवीत यश

                सांगोला (कटुसत्य वृत्त): डी.फार्मसी प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा नुकतीच पार पडली.कोरोना रोगाच्या प्रादुर्भावानंतर ऑफलाईन पद्धतीने प्रथमच परीक्षा घेण्यात आली.कोरोना संकटामुळे विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या अस्थिर झाला होता परंतु सह्याद्री फार्मसी महाविद्यालयाच्या अचूक धोरण,नियोजन,शिस्त व महाविद्यालयाचे असणारे शैक्षणिक वातावरण यामुळे डी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी या सर्व संकटावर मात करून वार्षिक परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले त्याचे सर्व शिक्षकांनी व पालकांनी कौतुक केले. द्वितीय वर्ष डी.फार्मसी मधून प्रथम कु.ऋतुजा हणमंत नरनावर (८४.७० %), द्वितीय कु. अक्षदा औदुंबर गाडगे (८३.४०%) , तृतीय चि.काशिनाथ सिद्धाराम पाटील (८१.३०  % ) यांनी तर प्रथम वर्ष डी.फार्मसी मधून प्रथम कु.प्रविणा पांडुरंग आयरे  ( ८१. ३३    % ) , द्वितीय कु.पूजा गोविंद रुपनार ( ७७.१०% ), तृतीय कु.वैष्णवी विठोबा दुधाळ  ( ७६.७०% ) यांनी गुण मिळवून यश संपादन केले . 

                सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीपकुमार इंगवले, प्राचार्य डॉ. मनोजकुमार पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेछया दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages