सवंग लोकप्रियतेसाठी अनेक घोषणा केल्याने अनेक सहकारी संस्था देशोधडीला लागल्या - राजन पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 8, 2022

सवंग लोकप्रियतेसाठी अनेक घोषणा केल्याने अनेक सहकारी संस्था देशोधडीला लागल्या - राजन पाटील

सवंग लोकप्रियतेसाठी अनेक घोषणा केल्याने अनेक सहकारी संस्था देशोधडीला लागल्या - राजन पाटील



मोहोळ नागरी सहकारी पतपुरवठा संस्थेची ३८ वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न 

                 मोहोळ (कटुसत्य वृत्त): आजमितीला सहकारी संस्था चालविणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. सहकारी संस्था चालवीत असताना सभासद , ठेवीदार व कर्जदार या सर्वांचे हित बघितले पाहिजे लोकनेते बाबुराव आण्णा पाटील यांनी मोहोळ नागरीचे लावलेल्या छोट्याश्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झालेले आपण पाहतो आहोत असे सांगत  केवळ सवंग लोकप्रियतेसाठी मोठं मोठ्या घोषणा केल्याने जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था देशोधडीला लागल्या आहेत.परंतू आजही ३८ व्या वर्षी मोहोळ नागरी या संस्थेची गरुड भरारी वाखण्याजोगी आहे.असे प्रतिपादन माजी आमदार राजन पाटील यांनी केले. 

                 सोमवारी दि.८ रोजी  मोहोळ नागरी सहकारी पतपुरवठा संस्थेची  ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या लोकनेते बाबुराबआण्णा पाटील सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात चेअरमन डॉ.कौशिक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रारंभी लोकनेते बाबुरावआण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राजन पाटील बोलत होते.

                 यावेळी चेअरमन डॉ.कौशिक गायकवाड , व्हॉइस चेअरमन प्रमोद डोके , सतीश भोसले ,जगन्नाथ कोल्हाळ ,पंडीत निकम शहाजी गुंड ,सचिन फाटे, इस्माईल तांबोळी, रमेश देशमाने, तानाजी रोहिटे, चंद्रकांत वाघमोडे, सुधीर ननवरे, रंभादेवी गुंड, कीर्ती देशपांडे, ब्रम्हदेव भोसले ,नागनाथ सोनवणे  ,सुरेश घाडगे ,श्रीकांत गायकवाड, काका भोसले,सुरेश घाडगे, राकेश देशमाने, रघुनाथ भोसले ,राजेश खपाले ,शिवाजी चव्हाण , महेश पवार आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व अहवाल वाचन मॅनेजर मुश्ताक शेख यांनी केले तर  तर आभार व्हॉइस चेअरमन प्रमोद डोके  यांनी मानले .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages