रोटरी क्लबच्या देशभक्तीपर नृत्य स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचे यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 17, 2022

रोटरी क्लबच्या देशभक्तीपर नृत्य स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचे यश

रोटरी क्लबच्या देशभक्तीपर नृत्य स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचे यश

                सांगोला (कटूसत्य वृत्त):- रोटरी क्लब ऑफ सांगोला आणि इनव्हील क्लब ऑफ सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित आयोजित देशभक्तीपर समूह नृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून विदयार्थी सर्वांगीण विकासासाठी "हम भी कुछ कम नही" हे दाखवून दिले. सदर स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता.

                सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय नेहमीच विदयार्थी विकासासाठी शालांतगत आणि शाळा बाह्य स्पर्धेत सहभागी होवून यश प्राप्त करुन यशाचा झेंडा रोवत आहे. दि 17 ऑगस्ट रोजी समूह नृत्य स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे यांच्या हस्ते रोख बक्षीस, ट्रॉफी आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला.

                या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक उदय बोत्रे यांनी सर्व यशस्वी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थी विकासासाठी आपले विद्यालय नेहमीच कटिबध्द आहे. सर्व शिक्षक सुद्धा नवनवीन कल्पना आणि सृजनशीलतेचा वापर करून विदयार्थी विकासासाठी प्रयत्न करीत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे.

                देशभक्तीपर समूह नृत्य स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना चेतन कोवाळे,शुभांगी पवार, शशिल ढोले-पाटील, इकबाल शेख यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थाध्यक्ष  पी.सी. झपके, संस्था सचिव म. शं. घोंगडे, संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे, विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय स्टाफ, सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिल ढोले-पाटील यांनी केले तर आभार रेश्मा बनसोडे यांनी मानले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages