व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांची हॉटेल सुनील येथे सदिच्छा भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 17, 2022

व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांची हॉटेल सुनील येथे सदिच्छा भेट

व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांची हॉटेल सुनील येथे सदिच्छा भेट

               मोहोळ (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा शिवसेनेचे उपनेते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी पाकणी येथील उद्योजक सुनील वाघमोडे यांच्या हॉटेल सुनील  येथे सदिच्छा भेट देऊन जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी हॉटेलच्या उत्कृष्ट पदार्थाबद्दल व नियोजनाबद्दल कौतुक केले.

               महाराष्ट्रात शिवव्याख्यानाच्याद्वारे तरुणांना मार्गदर्शन करून गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी काम करणारे शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी हॉटेल सुनिल येथे सदिच्छा भेट देऊन स्वादिष्ट जेवण, उत्कृष्ट नाष्टा व राज्यात प्रसिद्ध असलेला लांबोटी चिवडा व शेंगा चटणी याचा आस्वाद घेतल्यावर एक वेगळा अनुभव आल्याची भावना प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी उद्योजक सुनील वाघमोडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

               यावेळी हॉटेल सुनील चे मालक सुनील वाघमोडे, प्रेम वाघमोडे, अनिल वाघमोडे, कुबेर वाघमोडे, चंद्रशेखर वाघमोडे, रोहित वाकडे, अभिमान वाघमोडे, श्रीनिवास वाघमोडे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages