दुरावस्था झालेल्या रस्त्याची नव्याने दुरुस्ती करा मनसेचे प्रांतासमोर एकदिवसीय उपोषण

कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- गेल्या वर्षभरापासून कुर्डुवाडी-माढा रस्त्यावरील भोसरे वडाचीवाडी वेताळवाडी गावालगतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे डागडुजी न करता रस्ता नव्याने तयार करावा या मागणीसाठी मनसेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयासमोर सकाळी ११ ते ४ वाजणेच्या सुमारास एकदिवसीय उपोषण करण्यात आले.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे शहराध्यक्ष सागर बंदपट्टे अतुल खूपसे अनिल आरडे बाळासाहेब टोणपे सागर गडधारे रेखा चांदणे सविता सवणे सोमनाथ पवार बंटी हनवते सलीम पठाण साजिद शेख संतोष भोसले अमोल सरवदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दिलेल्या निवेदनात म्हटले की कुर्डुवाडी शहरातून माढा अनगर मोहोळ व सोलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूकही भली मोठी आहे याच रस्त्यावरून वैराग मानेगाव मालवंडी रिधोरेसह आसपासच्या ग्रामीण भागात ये-जा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसही येथूनच धावत आहेत शहरी भागाबरोबरच वाडया वस्त्यावरील नागरीकांना न्यायालये तहसील भूमीअभिलेख बँका नगरपंचायत कार्यालयात जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे.
दररोज कार्यालयीन अधिकारी कर्मचारी विधिज्ञ नोकरदार मजूर शाळकरी मुला-मुलींसह इतर मंडळी हे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास याच मार्गावरून आपापल्या कार्यस्थळावर मार्गस्थ होतात परंतु बेसुमार खड्ड्याचा विळखा व दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे कामकाजास विलंब होतो तसेच रेंगाळलेल्या अर्धवट कामामुळेही ऐन पावसाळ्याच्या दिवसात खड्यात पाणी साचून परिसर दुर्गंधीने व्यापला जातो व त्यातून तारेवरची कसरत करीत एकतर्फा मार्ग काढावा लागतो असे निवेदनात नमूद करण्यात आले.
No comments:
Post a Comment