आ.श्रध्देय सुधाकरपंत परिचारक यांचे व्दितीय पुण्यस्मरण निमित्त राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प.चारुदत्त गोविंद आफळे यांचे किर्तन संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 17, 2022

आ.श्रध्देय सुधाकरपंत परिचारक यांचे व्दितीय पुण्यस्मरण निमित्त राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प.चारुदत्त गोविंद आफळे यांचे किर्तन संपन्न

आ.श्रध्देय सुधाकरपंत परिचारक यांचे व्दितीय पुण्यस्मरण निमित्त राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प.चारुदत्त गोविंद आफळे यांचे किर्तन संपन्न


                 पंढरपूर (कटुसत्य वृत्त): पंढरपूर तालुक्याचे भाग्य विधाते पांडुरंग परिवाराचे नेते माजी.आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे व्दितीय पुण्यस्मरण निमित्ताने श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना वाखरी पंढरपूर ऑफिस येथे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प.चारुदत्त गोविंद आफळे यांचे किर्तन झाले. कार्यक्रमाच्या सुरवातीस आफळे महाराजांचा सत्कार श्री.दिनकरभाऊ मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

                 आफळे महाराज म्हणाले महाराष्ट्रातील दोन्ही किर्तन पध्दतीचे श्रीमंत हे जानकार होते. आज श्रीमंत यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने आपण एकत्र आलो. सावरकर वाचनालय किंवा आणखी काही कामानिमित्त पंढरपूर मध्ये यायचो तेव्हा श्रीमंताचे दर्शन व त्यांच्याकडून काहीना काही एखादे सहज बोलणे उपदेश मला कानावर पडल्याचे भाग्य असायचे. वाचनालय तर्फे एखादे किर्तन व्हायचे तेव्हा श्रीमंत स्वत: म्हणायचे नारदीय किर्तनाची ओळ होवून जाऊदेत. श्रीमंत शब्द तेथेच सार्थ होत राहतो. त्यांच्या कार्याची यादी, त्या कार्याची यशस्वीता हीच त्यांची श्रीमंती अशा श्रीमंताच्या चरणी आपली सेवा रूजू करण्याची संधी तसेच श्रीमंताची मनोकामना त्यांचे आर्शिवाद असे पुर्ण करण्याच्या दृष्टीने तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. व पंरपरेनुसार पुष्पाजंली अर्पण करून त्याप्रसंगी सांप्रदायातील प्रसिध्द अभंग भक्ता म्हणून आणि सोबत भजन करत पुष्पाजंली अपर्ण करूया.

                 या प्रसंगी आ.प्रशांत परिचारक यांनी आफळे महाराज यांचा व त्यांचे सहकारी वादक व गायक यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले. तसेच पंढरपूर तालुक्यात प्रत्येक गावांमध्ये सकाळपासून मोठ्या मालकांच्या पुण्यस्मरणा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यांचा ही ऋुणी आहे असे म्हणाले व श्री पांडुरंग सहाकरी साखर कारखाना वाखरी ऑफिस येथे श्रध्देय सुधाकरपंत परिचारक मोठे मालक यांचा कायमस्वरूपी स्मारक उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages