राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार

दि.३० ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करा - प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय आदर्श शाळा,आदर्श मुख्याध्यापक,आदर्श शिक्षक, आदर्श सेवक पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम यांच्या आदेशानुसार शिक्षक दिनी सोलापूर येथे घेणार असल्याची माहिती मंत्रालय समन्वय समिती सदस्य व प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ यांनी दिली.
शिक्षक महासंघाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांचा गुणगौरव सोहळा सोलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून इच्छुकांनी महासंघाचे पदाधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यामध्ये दि.३० ऑगस्ट पर्यंत आपले प्रस्ताव करावेत, संबंधित सर्व तालुकाध्यक्षांनी आपल्या तालुक्यातील सर्व शिक्षकांचे प्रस्ताव विहित नमुन्यामध्ये वेळेत वरील पदाधिकारी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई, कार्यक्रमाचे संयोजक बापूसाहेब आडसूळ यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment