समुह राष्ट्रगीत साठी जिल्ह्यात लाखो ग्रामस्थ, विद्यार्थी व महिला व मुलांचा सहभाग..!


सोलापूर (कटुसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील १०२८ ग्रामपंचायती मध्ये समुह राष्ट्रगीताचे आयोजन करणेत आले होते. सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात समुह राष्ट्रगीताचे आयोजन करणेत आले होते.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारण अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी , उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार, अतिरिक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रकांत सुर्वे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. शितल जाधव, कार्यकारी अभियंता दीपक कोळी , कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कृषी अधिकारी कुंभार, उप शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, प्रमुख उपस्थित होते.
देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमित्त ७५ च्या आकारात मानवी साखळीत राष्ट्रगीत गायन..!
अक्कलकोट पंचायत समित येथे आझादी का अमृत महोत्सवा निमित्त देशांचे स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण झाले बद्दल ७५ च्या आकारात मानवी साखळी करून राष्ट्रगीत गायन करणेत आले. गटविकास अधिकारी सचिन खुडे, महिला बाल विकास अधिकारी सुवर्णा जाधव, यांचे सह कर्मचारी उपस्थित होते.
सर्व ११ तालुक्यात पंचायत समिती व सराव ग्रामपंचायती मध्ये या समुह राष्ट्रगीत कार्यक्रमाची आयोजन करणेत आले होते. सर्व अंगणवाड्या, उमेद चे जवळ पास १५ हजार पेक्षा अधिक बचत गटातील महिला या मघ्ये सहभागी झाल्या होत्या. पंढरपूर तालुक्यांतील भोसे येथे शिस्तबध्द रित्या विद्यार्थ्यांनी संचलन करून ग्रामस्थांनी समुह राष्ट्रपती गायन केले.
ग्रामस्थांचा उस्फुर्त सहभाग, सर्वाचे अभिनंदन - सिईओ दिलीप स्वामी
स्वातंत्र्य संग्रामात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील ज्वाजल्य पराक्रमाचा इतिहास लोकांसमोर ठेवणेत आला. याचे स्मरण या निमित्ताने करणेत आले आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव चांगल्या उपक्रमाचे जिल्हयात आयोजन करणेत आले होते. पाककृती पासून ते समुह गीत व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. अद्यापही उपक्रम सुरू आहेत.
No comments:
Post a Comment