शरद साठे यांचे आकस्मिक निधन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 27, 2022

शरद साठे यांचे आकस्मिक निधन

शरद साठे यांचे आकस्मिक निधन

                 सांगोला (कटुसत्य वृत्त):- लक्ष्मीनगर ता. सांगोला येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष शरद लक्ष्मण साठे यांचे 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता आकस्मिक निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 32 वर्ष होते. शरद साठे यांच्या निधनाने सामाजिक कार्यातील सच्चा कार्यकर्ता हरवल्याची खंत अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.

                 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अनेक सामाजिक आणि विधायक कामाचा आदर्श त्यांनी जोपासला होता.त्यांच्या निधनाने लक्ष्मीनगर तसेच पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले,बहिण असा मोठा परिवार आहे.त्यांच्या तिसरा दिवसाचा विधी रविवारी सकाळी सात वाजता लक्ष्मीनगर येथे होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages