गणेशोत्सव कालावधीत कोकणवासीयांच्या सुखकर प्रवासाकरीता रायगड पोलीस सज्ज! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 27, 2022

गणेशोत्सव कालावधीत कोकणवासीयांच्या सुखकर प्रवासाकरीता रायगड पोलीस सज्ज!

गणेशोत्सव कालावधीत कोकणवासीयांच्या सुखकर प्रवासाकरीता रायगड पोलीस सज्ज!

रायगड पोलीस दला कडून सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा व वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन!

              बोरघर / माणगाव (कटुसत्य वृत्त): आगामी गणेशोत्सव सण हा दिनांक ३१/०८/२०२२ ते दिनांक ०९/०९/२०२२ या कालावधीत साजरा होणार आहे. कोकणवासीयांसाठी हा सर्वात मोठा व महत्वाचा सण असल्याने दरवर्षी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे इत्यादी विभागातील चाकरमानी तळकोकणात आप आपल्या गावी उत्सव साजरे करण्यासाठी विविध मार्गाने जात असतात. दरवर्षी गणेशउत्सव कालावधीत गणेशभक्त प्रवासाकरीता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ या मार्गानेच मोठ्या प्रमाणात कोकणाकडे जातात तसेच सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.

'एकूण बंदोबस्त 

              गणेशउत्सव सण २०२२ च्या कालावधीत रायगड जिल्हयातुन उत्सव साजरे करण्यासाठी तळकोकणात जाणा-या गणेशभक्तांचा प्रवास विनासायास व सुखकर व्हावा याकरीता रायगड जिल्हा पोलीस दलाकडुन कार्य सुरू करण्यात आले असून विविध प्रकारे विशेष नियोजन करण्यात आले आहे. खारपाडा ते पोलादपुर पर्यंत एकुण १० ठिकाणी विशेष पोलीस मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. मा. पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली १ अपर पोलीस अधीक्षक, ५ SDPO. ११ पोलीस निरीक्षक, २७ सपोनि / पोसई, २२५ पोलीस अंमलदार असे खारपाडा ते कशेडी घाट दरम्यान पाडण्यात आलेल्या ०६ सेक्टरमध्ये वाहतुक नियोजना करीता कर्तव्यार्थ सज्ज ठेवण्यात आले आहे.

सुसज्ज मनुष्यबळ / वाहतुक कोंडी उपाय योजना

              खारपाडा ते पोलादपुर दरम्यान १० वाहतुक मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. जेथे वॉकिटांकी सह २४ तास निरंतर पेट्रोलिंग करीता अधिकारी व अंमलदार सुसज्ज साहित्यांसह नेमण्यात आले असुन अपघात प्रसंगी किंवा वाहन नादुरुस्त होवून वाहतुक कोंडी होवु नये याकरीता १८ हायड्रा / क्रेन सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्हीची उभारणी करण्यात आली असुन त्याव्दारे वाहतुकीवर नजर ठेवण्यात येणार आहे.

तात्काळ वैद्यकीय मदत

              अपघात प्रसंगी किंवा कोणत्याही क्षणी प्रवाश्यांस मेडीकल सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता १४ अॅम्बुलन्स उपलब्ध ठेवण्यात आली आहेत. गणेश भक्तांना आवश्यकतेवेळी तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी याकरीताही उपाय योजना करण्यात आली असुन उपजिल्हा रूग्णालय पनवेल, पेण, माणगाव, ग्रामिण रूग्णालय महाड, पोलादपुर येथे वैद्यकिय पथके तैनात करण्यात आली आहेत.

              रायगड जिल्हा पोलीस दल सन २०२२ मध्ये गणेश भक्तांचे स्वागत करण्यास पुर्णपणे सज्ज असून, सर्व गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा याकरीता २४ निरंतर आपली सेवा प्रदान करण्यास बांधील आहे. गणेशभक्तांनीही प्रवासादरम्यान वाहतुक नियमांचे व वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे असे आवाहन रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांस करण्यात येत आहे. रायगड जिल्हा पोलीस दल सज्ज असुन सर्व भक्तांना रायगड जिल्हा पोलीस अधिकारी / अंमलदार व त्यांच्या कुटूंबियांतर्फे आगामी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. आपल्या आराध्य दैवताचा उत्सव साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यातून प्रवास करण्याची निवड करणार्या गणेश भक्तांची सर्वोतोपरी काळजी घेणे आमचे कर्तव्य आहे. गणेशोत्सव कालावधीत खारपाडा ब्रीज कशेडी घाट दरम्यान बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी व अंमलदार आपले कर्तव्यार्थ सर्व सुचनांसह सज्ज करण्यात आले आहेत. रायगड जिल्हा पोलीस दल सर्व गणेश भक्तांचा प्रवास हा विनासायास व सुखकर व्हावा या करीता २४ तास कार्यरत राहील, तसेच सर्व गणेशभक्तांनी देखील वाहतुकीचे नियम पाळावेत, कोणत्याही आपत्कालीन परिस्थिती अथवा अडचणी मध्ये मदती करीता तात्काळ आपत्कालीन मदत व सहाय्य यंत्रणा संपर्क क्रमांक पोलीस नियंत्रण कक्ष / वाहतूक शाखा ०२१४१-२२८४७३/ २२८७८९ / २२२०२८, ८६०५४९४७७२ / १०० , IRB ९८२२४९८२२४ / डायल ११२ येथे संपर्क साधावा असे आवाहन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय अशोक दुधे साहेब आणि रायगड जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक माननीय अतुल झेंडे साहेब यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages