बोगस एनए ऑर्डरची चौकशी सीबीआय मार्फत करावी; रोहन सुरवसे पाटील यांनी मुख्यमंत्री यांचेकडे केली मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 26, 2022

बोगस एनए ऑर्डरची चौकशी सीबीआय मार्फत करावी; रोहन सुरवसे पाटील यांनी मुख्यमंत्री यांचेकडे केली मागणी

 बोगस एनए ऑर्डरची चौकशी सीबीआय मार्फत करावी


रोहन सुरवसे पाटील यांनी मुख्यमंत्री यांचेकडे केली मागणी

 पुणे (कटूसत्य वृत्त):- पाच महिने होऊन गेले तरी बोगस एन ए ऑर्डर लावून दस्त नोंदणी करणारे यांच्यावर्ती अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली आहे.

        प्रसार माध्यमांशी बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की  मार्च २०२२ या महिन्यामध्ये बोगस N.A. ऑर्डरची लेखी तक्रार करून हवेली क्र.३ मध्ये ११२ प्रकरणे ही  सिध्द झाली यानंतर मी लेखी २५ प्रकरणांची तक्रार एप्रिल २०२२ मध्ये  दिली. मार्च महिन्यापासून आजपर्यंत हवेली क्र.३ या ठिकाणी फक्त ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मी या प्रकरणाची चौकशी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर,नोंदणी उपमहानिरीक्षक गोविंद कराड व सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांच्याकडून वारंवार उडवाउडवीची उत्तरे आली. प्रांत ऑफिसकडून अहवाल येत नाहीये असे पारखे साहेब यांनी सांगितले,  तो आला तर पोलीस प्रशासन आमच्याकडून गुन्हे दाखल करून घेत नाहीत असे सांगण्यात आले.असे म्हणून  या प्रकरणाची CBI मार्फत चौकशी करून त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.यावेळी अन्य तक्रार दार दिपेश ननावरे, सुनिल कुसाळकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages