आझादी गौरव पदयात्रातून काँग्रेस पक्षाचे कार्य, विचार जनतेसमोर मांडणार - डॉ. धवलसिंह मोहिते पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 5, 2022

आझादी गौरव पदयात्रातून काँग्रेस पक्षाचे कार्य, विचार जनतेसमोर मांडणार - डॉ. धवलसिंह मोहिते पाटील

आझादी गौरव पदयात्रातून काँग्रेस पक्षाचे कार्य, विचार जनतेसमोर मांडणार - डॉ. धवलसिंह मोहिते पाटील

                   सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात ११ तालुक्यात दि.९ ऑगस्ट ते१५ ऑगस्ट पर्यत आझादी गौरव  पदयात्रा हि ७५ किलोमीटरची पदयात्रा प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातून जाणार आहे. पदयात्रेत पदाधिकारी कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित राहून काँग्रेस पक्षाने केलेली विकासाचे कामे सर्वसामान्य जनतेसमोर मांडणार असून देशाला स्वतंत्र्य  काँग्रेस पक्षाने मिळवून दिले आहे. आत्ता जातीय शक्तीपासून वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाची गरज आहे. आत्ता आझादी गौरव पदयात्रातून काँग्रेस पक्षाचे विचार, कार्य जनतेसमोर मांडणार असल्याचे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले.

                   सध्याच्या काळात आपणास लोकशाही मार्गाने लढाईचे आहे या यात्रेच्या माध्यमातून आपण जनतेसमोर जाणार आहोत आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत याचा फायदा काँग्रेस पक्षाला होणार आहे. देशाच्या स्वतंत्र साठी महात्मा गांधी, पंडित नेहरूंनी देशाला स्वतंत्र मिळवून दिले ते स्वातंत्र्य टिकविण्याची जबाबदारी आपणावर आहे. असे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी म्हणाले  

                   आत्ता लोकात जाण्याची गरज आहे, वातावरण निर्मिती करा. ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले ते सध्या बाजूला आहेत तर ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीही केले नाही ते आज सत्तेवर आहेत. हे या आझादी गौरव पदयात्रातून लोकांना सांगायचे आहे. काँग्रेसला लाओ देश बचावो. काँग्रेस लाओ संविधान बचाव चे नारे द्यायचे आहेत. आझादी गौरव पदयात्रा शिस्तबद्ध काढा. ज्येष्ठ नेत्यांचे  मार्गदर्शन ठेवा. पक्षाचे विचार जनतेसमोर मांडा देशासाठी लढलेल्या स्वातंत्र्य  सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान, सत्कार करा. असे माजी आमदार ,प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामहरी रुपनवर म्हणाले.

                   यावेळी माजी युवक काँग्रेसचे अध्यक्ष दादासाहेब साठे, महिला काँग्रेस अध्यक्ष शाहिन शेख, तालुका अध्यक्ष हरीष पाटील, प्रा. सिद्राम सलवदे, किशोर पवार, सौदागर जाधव, विजय साळुंखे, सुनील भोरे, राजेश भादुले, नितीन चोपडे, अण्णासाहेब इनामदार, सुरेश हावळे, बाजीरंग बागल, फ्रंटल सेलचे अध्यक्ष गजेंद्र खरात, हरिश्चंद्र राठोड, राजेंद्र रुपनवर, वसीम पठाण, कविता कदम, रणजितसिंह देशमुख, रमजान नदाफ यांनी आपले मत मांडले.

                   यावेळी माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, वरिष्ठ उपाध्यक्ष भीमाशंकर जमादार, प्रदेश काँग्रेसचे चिटणीस प्रा.पंडित सातपुते, जुगलकिशोर तिवारी, प्रदेश ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष सुधीर लांडे, सरचिटणीस भीमराव बाळगे, जिल्हा संघटक रमेश हासापुरे, उपाध्यक्ष मल्लेश बिडवे, अशोक देवकाते, राधाकृष्ण पाटील, मोतीराम चव्हाण, नागेश गंगेकर, राजेश पवार, पंडित सातपुते विजयकुमार हत्तुरे, अशोक कस्तुरे, रशीद शेख, धर्मराज पुजारी, गोविंदराव पंके, कांतीलाल राऊत, मुन्ना हराणमारे, शालीवाहान माने- देशमुख, सिद्धार्थ गायकवाड, राजु गायकवाड, सिकंदरताज पाटील, गोपाळ गुळवे, सतीशपालकर, तेजेस्वीनी मरोड, चंद्रकलाताई पाटील, अरुणा बेंजरपे, शैला गोसावी, रामकृष्ण जवळेकर, सुरेश शिवपूजे, सुदर्शन अवताडे, रवींद्र शिवशरण,महेश जोकारे, मोहम्मद शेख, जे. टी.जाधव, रावसाहेब होनमाने,  सिद्राम पवार कृष्णदेव वाघमोडे, सुरेश शिंदे, डॉ.आप्पासाहेब बगले, वशिष्ठ सोनकांबळे, सचिन गुंड, रफिक पाटील, तानाजी जगदाळे, निखिल मस्के, निलेश मांजरे, महादेव कांबळे, सागर सोलापूरे, अप्पू शेख, दत्ता गाढवे, दीपक नारायणकर, नवनाथ साठे,दत्तात्रय शेटे आदी उपस्थित होते. सदर बैठकिचे सूत्रसंचालन अशोक कस्तुरे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages