लोकनेते बाबूराव अण्णा पाटील अनगरकर यांची,लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अनगरकर येथे साजरी

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- अनगरच्या कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्व.लोकनेते बाबूराव अण्णा पाटील अनगरकर यांची जयंती, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. ज्येष्ठ साहित्यीक प्राचार्य श्रीपाल सबनीस हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य चंद्रकांत ढोले यांनी स्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अजिंक्यराणा पाटील होते. यावेळी बोलताना सबनीस म्हणाले,ब्राह्मण व ब्राह्मणेतर इतिहासकारांनी आपल्या सोईनी इतिहास न लिहिता तो वास्तव लिहिला पाहिजे. जाती जातीत निर्माण होणारी तेढ कमी करुन सजग नागरीक निर्माण करण्याचे काम आपण केले पाहिजे.यावेळी जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व, हस्ताक्षर, धावणे या स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. यावेळी आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे व सायकल बँकेतून सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. प्रेमचंद गायकवाड तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत सुर्यवंशी हे होते. यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रा. डॉ.रविंद्र देशमुख व प्रा. डॉ. तुषार रोडगे लिखित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
No comments:
Post a Comment