कॉंग्रेसचे जिल्ह्याचे नेते नागेश गंगेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 24, 2022

कॉंग्रेसचे जिल्ह्याचे नेते नागेश गंगेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

कॉंग्रेसचे जिल्ह्याचे नेते नागेश गंगेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

            पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश गंगेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला.

            अतिशय साधेपणाने वाढदिवस साजरा करीत असताना वायफट खर्च न करता लहान मुलांना शालेय साहित्य वाटप त्याचप्रमाणे अनाथाश्रम , वृद्धाश्रम , अंधशाळा येथे विविध कार्यक्रम घेऊन फुल नाही फुलांची पाकळीप्रमाणे गोरगरिबांना अन्नदान ,कपडे वाटप केले जाते. परंतु यावेळी लहान मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 

            नागेश गंगेकर हे अतिशय गरीब परिस्थिती वर मात करून शून्यातून विश्व निर्माण केले नेते म्हणून ओळखले जातात. त्यांना गोरगरिबांची तळमळ वाटते .ते गोरगरीब , शोषित पिढीतील समाजातील वंचित घटकांना व आठरापगड जातीतील समाजाला सतत आर्थिक, अन्न दिनाच्या रुपाने सहकार्य करीत असतात. एखाद्याला दवाखान्यासाठी किंवा लग्नाच्या निमित्ताने पैशाची गरज भागवतात. अन्नधान्य कपडे अशा रुपाने गोरगरिबांना सहकार्य करण्याची भावना असणारे आणि दिनदुबळ्यांच्या डोळ्यातील आसवं पुसून चेहऱ्यावर हसू फुलवून गोरगरिबांसाठी दाता म्हणून ओळखले जाणारे तसेच साधी राहणी आणि उच्च विचार सरणी असे नेतृत्व , दातृत्व आणि कतृत्वाचा महामेरू म्हणजे नागेश गंगेकर यांची ओळख आहेत असे गौरवोउद्गगार कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ मार्गदर्शक मामासाहेब फलटणकर यांनी काढले.

            यावेळी समाजसेवक आबासाहेब कापसे, अध्यक्ष औदुंबर गंगेकर यांनी ही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला संजय उपळकर , शिवशरण टमटम , विवेक गंगेकर, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सुरज गंगेकर , नरेश पिंगळे, आदेश भिंगारे, राकेश गंगेकर, अमर शेटे, गोपाळ पोकळे महाराज , महेश भिंगारे, अध्यक्ष राहुल गंगेकर, ओंकार टमटम, शुभम उपळकर,रॉक कुंदुर,अभिषेक टमटम, ओंकार टमटम, अनिल इंदापुरकर,अमर उपळकर, काळू टमटम, धीरज भिंगारे, आयुष पानकर,संकेत भिंगारे, शुभम परदेशी, फिरोज एरनाळे,मंगेश टमटम, रंजीत आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages