सत्यमेव अर्बन मल्टिपल चा प्रथम वर्धापन दिन व वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सांगोला (कटूसत्य वृत्त):- खेड भोसे ता पंढरपूर येथील सत्यमेव अर्बन बँकची प्रथम वर्धापन दिन व वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 21/08/2022 रोजी हनुमान मंदिर खेड भोसे येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार श्री दत्तात्रय सावंत सर होते तर प्रमुख पाहुणे मा श्री अभिजीत (आबा) पाटील व मा श्री प्रणवजी परिचारक होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे संस्थापक श्री भारत झांबरे सर यांनी केले. मान्यवरांचे सत्कार संस्थेचे संस्थापक श्री भारत झांबरे सर , चेअरमन श्री नितीन पवार , व्हा. चेअरमन श्री अनिल झांबरे , सचिव श्री अमोल पवार , श्री अरुण पवार , डॉ. महेश पवार, डॉ शखेर झांबरे , चि. ज्ञानेश्वर झांबरे , चि. सोमनाथ झांबरे , चि. प्रवीण पवार , श्री औदुंबर पवार , चि. अक्षय पवार यांच्या हस्ते करण्यात आला. अहवाल वाचन श्री समाधान लोंढे(बँक सचिव) यांनी केले. या वेळी संस्थे कडून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखानाचे नूतन संचालक श्री कालिदास साळुंखे व सोसायटीचे चेअरमन श्री धनाजी साळुंखे ,व्हा. चेअरमन श्री संतोष मोरे ,सदस्य श्री महादेव साहेबराव पवार , श्री बाळासाहेब वासुदेव पवार , श्री हरिदास देविदास पाटील, श्री प्रशांत बळीराम पवार , श्री गणेश धुळा थोरात यांचा सत्कार करण्यात आला . कोरोना कालावधी ज्यांनी अनेक लोकांचे प्राण वाचवले , ज्यांनी प्रबोधन करून लसीकरणाची कामे केली आशा शिक्षक व डॉक्टर यांच्या कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. खेड भोसे रत्न हा पुरस्कार श्री मारुती शामराव पवार ( गुरुजी) यांना देण्यात आला. तर कोरोना योद्धा श्री सज्जन सिताराम लोंढे (सरपंच खेड भोसे), श्री अर्जुन पवार ( गुरुजी) , श्री रामचंद्र बेलकर (गुरुजी) , श्री अण्णासाहेब वासुदेव पवार (दैनिक पांढरी पत्रकार) , डॉ. उमेश गोरे , डॉ. सौ.राऊत मॅडम , डॉ. गुंडिबा साळुंखे डॉ. भाग्यवंत पवार , डॉ. महेश पवार , डॉ. सौरूप साळुंखे , डॉ. शेखर झांबरे . श्री मनोज माने ( संजीवनी मेडिकल खेड भोसे) , चि. गणेश दीक्षित ( ग्रामपंचायत कर्मचारी) , अंगणवाडी सेविका सौ.कौशल्या धनाजी कोळी , सौ सारिका मनोज बेलकार, श्री अण्णासाहेब अंबादास लवटे ( वायरमन महावितरण खेड भोसे) यांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.बँकेचे कर्मचारी चि. सागर पवार , ची.समाधान लोंढे , श्री महेश बेलकर , चि.अभिषेक साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला.बँकेने कमी कालावधीत चांगली कामगिरी केल्या बद्दल सर्व मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला गावातील श्री ब्रम्हदेव पवार गुरुजी, श्री शिशुपाल (आण्णा)पवार , श्री अंकुश पाटील, श्री महादेव पाटील, श्री अशोक (बापू) पवार श्री सिद्राम (आबा) पवार श्री सुरेश माणिक पवार, श्री अभिमान (बापू) पवार, श्री तानाजी दादा पवार (गुरुजी), श्री हनुमंत (आबा) पवार, श्री भारत रामा पवार, श्री नारायण माणिक पवार , श्री धनाजी पवार ,श्री सिद्धेश्वर पवार, श्री सिद्धेश्वर पाटील, श्री राजू जमदाडे , श्री बंडू पवार, श्री पांडुरंग पवार , श्री शरद पवार श्री नंदकुमार पवार, श्री संतोष पवार, श्री विकास पवार , श्री हेमंत पवार , श्री बाबासाहेब पवार श्री सत्यवान जाधव , श्री अनिल फाटे , श्री हरि बेलकर श्री औदुंबर पवार, श्री राघू पाटील, श्री सर्जेराव पवार श्री अंकुश पवार ,श्री बाळासाहेब साळुंखे , श्री महादेव वामन पवार , संतोष बिभीषण पवार , श्री पोपट यशवंत पवार, श्री समाधान सिद्राम पवार , श्री सदाशिव पाटील, श्री अंकुश पवार , श्री हनुमंत गोवर्धन पवार , श्री बाळू पवार श्री समाधान माने श्री शंकर पवार , श्री विष्णू साळुंखे , श्री जगन्नाथ पवार , श्री पोपट साळुंखे , श्री विजय झांबरे , श्री नामदेव ज. पवार श्री शंकर सावंत , श्री समाधान पवार , आजी माझी सरपंच अनेक संस्थांचे पदाधिकारी , डॉक्टर , शिक्षक , सभासद , ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अंकुश गाजरे सर यांनी केले . आभार प्रदर्शन चेअरमन श्री नितीन पवार यांनी मांडले.
No comments:
Post a Comment