पंचायत समिती सांगोल्याला लागले भ्रष्टाचाराचे ग्रहण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 24, 2022

पंचायत समिती सांगोल्याला लागले भ्रष्टाचाराचे ग्रहण

 पंचायत समिती सांगोल्याला लागले भ्रष्टाचाराचे ग्रहण

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत  विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक गजाआड


सांगोला (कटूसत्य वृत्त):- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत असताना सांगोला पंचायत समितीला मात्र भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याचे दिसून आले. दिनांक 24 सप्टेंबर रोजी पारे गावचे ग्रामसेवक सुरेश सुधाकर फासे वय 45 आणि विस्तार अधिकारी श्रावण बाजीराव घाडगे  वय 56 यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत 2500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.यातील तक्रारदार हे पारे गावचे ग्राम पंचायत सदस्य असून पारे गावातील गोरड वस्ती गोरड वस्ती येथे पाईपलाईनचे काम पंधरावा वित्त आयोग 2020 21 अंतर्गत मंजूर झाली असून सदरचे काम पारे ग्रामपंचायतीस मिळाले होते. त्या अनुषंगाने सदर कामाची सरळ जबाबदारी पार पाडण्याकरिता पारे येथील सरपंच यांनी लेखी आदेशान्वये यातील तक्रारदार यांची नियुक्ती केली होती.त्यानुसार व नमूद काम पूर्ण झाल्यानंतर सदर कामाचे बिल मंजूर होऊन मिळणे करिता तक्रारदार यांनी पाठपुरावा केला असता यातील ग्रामसेवक सुरेश फासे यांनी सदर बिलावर सही करून पंचायत समिती सांगोला येथील विस्तार अधिकारी श्रावण घाडगे यांच्याकडे सादर करण्याकरिता स्वतः करिता एक टक्का प्रमाणे पंधराशे रुपये व पंचायत समितीतून बिल मंजूर होण्याकरता विस्तार अधिकारी घाडगे यांच्याकरिता एक टक्का प्रमाणे पंधराशे असे एकूण तीन हजार रुपयेची मागणी केली.
       सदर मागणीस विस्तार अधिकारी घाडगे यांनी संमती देऊन तडजोडीअँटी त्यांचे करिता पाचशे रुपये कमी देण्यास सांगून उर्वरित रक्कम ग्रामसेवक फासे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्या अनुषंगाने ग्रामसेवक फासे यांनी तक्रारदार यांच्याकडून अडीच हजार रुपये  रक्कम स्वीकारत असताना वाढेगाव नाका सांगोला येथे तर श्रावण  घाडगे विस्तार अधिकारी यांना पंचायत समिती कार्यालयातून तात्काळ ताब्यात घेण्यात आले.  तरी वरील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक ला प्र.वि. पुणे राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक ला प्र.वि पुणे सुरज गुरव,पोलीस उपअधिक्षक  ला प्र.वि सोलापूर संजीव पाटील, पोलीस निरीक्षक ला प्र.वि सोलापूर उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार मपोना स्वामी,पोना घाडगे, पोशि सणके, चापोना उडाणशिव,  सर्व नेमणूक सदस्य अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांच्या वतीने करण्यात आली आहे. 
      लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर,जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की भ्रष्टाचारा संबंधित काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा पोलीस उपाधीक्षक अँटी करप्शन ब्युरो श्री छत्रपती शिवाजी रंगभवन चौक सोलापूर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages