कार्यालय तोडफोडीवरून शिंदे गट- राष्ट्रवादीत कलगीतुरा

मुंबई, (नासिकेत पानसरे):- शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचे कात्रज येथील कार्यालय तोडफोडीवरून शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी असा कलगीतुरा रंगला आहे.आपले कार्यालय शिवसैनिकांनी नव्हे तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फोडले असा सनसनाटी आरोप सावंत यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना थेट आव्हान दिले आहे जर असे असेल तर मी तुमच्या बाजूने उभी राहीन असे आव्हानच सुळे यांनी दिले.
गुवाहाटी येथे असताना शिवसैनिकांनी माझं कार्यालय फोडलं नव्हतं. “माझं कार्यालय फोडणारे जे कार्यकर्ते होते ते सेनेचे नव्हते. एखादा दुसरा असेल असे सांगतानाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गळ्यात भगवं घालून कार्यालय फोडलं,असा आरोप शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी केला आहे.कार्यालयावर हा हल्ला झाल्यानंतर मी गुवाहाटीमधूनच इशारा दिल्याची आठवणही सावंत यांनी करुन दिली. “मी त्यावेळेसही गुवाहाटीमधून सांगितलं होतं की, सगळ्यांनी आपआपल्या औकादीत रहावं. आपण कोणाशी पंगा घेतोय हे डोक्यात ठेवावं आज आम्ही सत्तेत आहोत. सत्तेचा माज आम्ही डोक्यात चढू देणार नाही. ज्यांनी कोणी कार्यालयावर दगड पाडायचा, त्या माध्यमातून मोठं व्हायचा प्रयत्न केला असेल त्यांना भविष्यात त्यांची जागा कळेल,”असा इशारा देखील सावंत यांनी दिला .
दरम्यान सावंत यांच्या या इशाऱ्या नंतर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी असे जर झाले असेल तर मी सावंत यांच्या बाजूने उभी राहील असे एकप्रकारे आव्हानच सावंत यांना दिले आहे.
No comments:
Post a Comment