...तर आमच्या कार्यालयातील तुमचे फोटो काढून टाकू - आमदार संजय शिरसाठ यांचा ईशारा

मुंबई, (नासिकेत पानसरे):- शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईने आम्ही आमदार झालो आहोत. त्यांचा फोटो आमच्याकडून कधीच निघणार नाही. ते आमच्यासाठी दैवत आहेत आणि कायम राहतील असे सांगतानाच,आम्हाला मर्यादा सोडून बोलायला लावू नका. आम्हाला गद्दार म्हणाल तर आम्ही आमच्या कार्यालयातील तुमचे फोटो काढून टाकू, असा इशारा औरंगाबादचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे.
आम्हाला गद्दार म्हटलं जात आहे.साहेबांनी आम्हाला गद्दार म्हटले आहे, त्यांना नमस्कार,असे म्हणून आमच्या कार्यालयात आम्ही बसू शकत नाही. तुमच्या विरोधात बोलण्याची आमची मानसिकता नाही. आम्हाला मर्यादा सोडून बोलायला लावू नका. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईने आम्ही आमदार झालो आहोत. त्यांचा फोटो आमच्याकडून कधीच निघणार नाही. ते आमच्यासाठी दैवत आहेत आणि कायम राहतील.मात्र जे आम्हाला गद्दार म्हणतील त्यांचे फोटो आम्ही कधीही ठेवणार नाही, असे संजय शिरसाट म्हणाले. तसेच आम्ही विरोधात बोलावे, असे त्यांना वाटत असेल तर आम्ही निश्चित त्यांच्या विरोधात बोलू,असा इशाराही शिरसाट यांनी दिला.
दरम्यान, सोमवारी कोल्हापुरात बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली.आम्ही ज्यांना मोठं केलं, ज्यांना राजकीय ओळख दिली,त्यांनीच घात केला.ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. हे गद्दार आहेत. बेडकासारखी उडी मारून ते तिकडे गले आहेत,अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. तसेच अजूनही कोणाला उद्धव ठाकरे यांच्याकडे परतावे असे वाटत असेल, तर त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत. आम्ही त्यांचे स्वागतच करू. पण बंडखोरी केलेले आमदार हे गद्दार आहेत आणि भविष्यातही ते गद्दार म्हणूनच ओळखले जातील, असा घणाघात आदित्य ठाकरे आपल्या शिव संवाद दौऱ्या दरम्यान करीत आहेत.
No comments:
Post a Comment