अस्लम शेख -फडणवीस-मोहित कंबोज भेटीवर नाना पटोले यांचा खुलासा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 2, 2022

अस्लम शेख -फडणवीस-मोहित कंबोज भेटीवर नाना पटोले यांचा खुलासा

अस्लम शेख -फडणवीस-मोहित कंबोज भेटीवर नाना पटोले यांचा खुलासा 

                    मुंबई, (नासिकेत पानसरे) :-  कॉंग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर घेतलेली भेट तसेच भाजपनेते मोहित कंबोज यांच्यासोबत एकाच वाहनाने केलेल्या प्रवासावरून कॉंग्रेस पक्षात खळबळ माजली असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या वर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले मच्छीमारांच्या संदर्भात घेतलेले निर्णय रद्द न करणे यासंदर्भात ती भेट होती तसेच या भेटीनंतर मोहित कंबोज यांच्या गाडीतून केलेला एकत्रित प्रवास हा केवळ योगायोग होता अशी सारवासारव पटोले यांनी केली आहे.

                    अस्लम शेख मुख्यमंत्र्यांना भेटले होते. कारण अस्लम शेख हे मंत्री असताना त्यांनी मच्छीमारांसाठी काही चांगले निर्णय घेतले होते. ते निर्णय या सरकारने थांबवले आहेत. त्यामुळे मच्छामारांच्या हितासाठी अस्लम शेख हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटले,अशी माहिती पटोले यांनी दिली.

                    अस्लम शेख देवेंद्र फडणवीसांची भेट घेत होते,तेंव्हा या ठिकाणी मोहित कंबोज होते. त्यांचा वाढदिवस होता. अस्लम शेख तिथे आले. तेंव्हा मोहित कंबोज देखील तेथे आले होते. हा केवळ योगायोग होता. तसेच ते शेजारीच राहत असल्याने एकाच गाडीतून निघाले.या भेटीचा चुकीचा अर्थ काढू नये,असेही पटोले म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages