सांगोला शहरात कचरा आणि घाणीचे साम्राज्य; प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 29, 2022

सांगोला शहरात कचरा आणि घाणीचे साम्राज्य; प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत

 सांगोला शहरात कचरा आणि घाणीचे साम्राज्य; प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत



लवकरच शहर स्वच्छ न झाल्यास कचरा नगरपालिकेत आणून टाकणार:आनंदा माने


सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला नगरपरिषदेचा कारभार हा प्रशासनाच्या हाती गेल्यापासून शहरामध्ये स्वच्छतेच्या यंत्रणेचा पूर्णपणे बट्याबोळ झालेला आहे. शहरामध्ये ठिकठिकाणी कचरा व घाणीचे साम्राज्य असलेले दिसून येत आहे. त्याचबरोबर शहरातील घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचे प्रमाण वाढत चालले असून त्यामुळे डेंग्यू, मलेरीया यांसारख्या आजाराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील ओढा साफ केला जात होता, परंतू प्रशासन लागल्यापासून एकदाही हा ओढा साफ केला गेला नाही. त्यामुळे शहर व ओढा लवकरात लवकर स्वच्छ न केल्यास शहरातील कचरा नगरपरिषदेमध्ये आणून टाकण्याचा इशारा माजी नगरसेवक तथा गटनेते आनंदा माने यांनी दिला आहे.

सांगोला शहरातील वाढत्या अस्वच्छतेमुळे व घाणीच्या साम्राज्यामुळे नगरपरिषद प्रशासनाला शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये कसलाही रस नसल्याचे दिसून येते. कारण ज्यावेळी स्वच्छ सर्व्हेक्षणाचे काम चालू होते, फक्त त्याचवेळी नगरपरिषदेचे प्रशासन प्रमुख सक्रीय होतात. इतर वेळी मात्र ते कामांच्या निविदा प्रक्रियांच्या आर्थिक वाटाघाटी करण्यामध्ये गुंग असतात, अशी माहिती सुध्दा काही ठेकेदारांकडून मिळत आहे.

त्याचबरोबर नगरपरिषदेकडील आरोग्य विभागाचा 130 कामगारांचा ठेका असून प्रत्यक्षात मात्र 50 एवढेच कामगार कार्यरत असल्याचे समजते. त्यामुळे शहराचा भार पूर्णपणे या 50 कामगारांवर पडत आहे. व गैरहजर असणार्‍या 80 कामगारांचा एकत्रित मिळून एका दिवसाचा पगार 32 हजार रू असून महिन्याचा पगार 9 लाख 60 हजार रू. होत असून गैरहजर कामगारांचे हजेरी पटावर हजेरी लिहून त्यांचाही पगार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व आरोग्याचा ठेका चालविणारे ठेकेदार यांच्या संगनमताने काढला जात असल्याचे कामगारांमधून बोलले जात आहे.अशा या भ्रष्टाचाराच्या वृत्तीमुळे नगरपरिषद प्रशासनाला पैसे खाण्याचा भस्म्या रोग झालाय का? अजून किती पैसे खाणार आहेत? नगरपरिषद निधी पूर्णपणे रिकामा झाला असून कार्यालयातील कामगारांचे पगारही वेळेवर होत नसल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages