सिंचन भवन येथे सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा
काँग्रेस प्रदेश युवक सरचिटणीस यांनी दिला पाठिंबा

पुणे (कटूसत्य वृत्त):- श्रीगोंदा येथील कुकडी विभाग क्रमांक दोन चे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांच्या विरुद्ध कृष्णा खोरे महामंडळ सिंचन भवन पुणे येथे सुरू असलेल्या उपोषणास स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस महाराष्ट्र राज्य रोहन सुरवसे पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
श्रीगोंदा कूकडी विभाग क्रमांक दोन चे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांना श्रीगोंदा येथे चार वर्षे पूर्ण झाली आहेत.त्यांची तात्काळ बदली कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बाहेर करण्यात यावी. या व इतर मागण्यांसाठी सोमवार दिनांक 29/08/2022 रोजी सकाळी 11.30 वाजले पासून कृष्णा खोरे विकास महामंडळ अधिक्षक अभियंता कुकडी मंडळ कार्यालया समोर प्राणांतिक उपोषण सुरू असून या उपोषण कर्त्यांची समक्ष भेटून प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस व स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी पाठिंबा दिला.
No comments:
Post a Comment